मुंबई- क्रूझ ड्रग प्रकरणात मुनमुन धमेचा या फॅशन मॉडेलची शनिवारी सायंकाळपर्यंत तुरुंगातून सुटका होईल, अशी आशा वकील काशिफ अली खान यांनी व्यक्त केली. मुनमुन धमेचाला आर्यन खानसह ड्रग प्रकरणात एनसीबीकडून अटक करण्यात आलेली आहे.
मुनमुन धमेचाचे वकील काशिफ अली खान म्हणाले, की, आम्हाला दुपारी ३ वाजेपर्यंत जामीनची कागदपत्रे मिळण्याची आशा आहे. जर आम्हाला जास्तीत जास्त साडेचार वाजपर्यंत वाजता कायदेशी प्रक्रिया पूर्ण झाली तर आमच्याकडे कागदपत्रे तयार करण्यासाठी पुरेसा वेळ असेल. त्यानंतर आम्ही ताबडतोब तुरुंग अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांना आज बाहेर काढू. तुरुंगाच्या नियमांनुसार, बुल ऑर्डर संध्याकाळी ५ वाजण्यापूर्वी सादर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन आर्यन खानची तुरुंगातून सुटका होईल.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा या तिघांना जामीन दिला आहे. या सर्वांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला आहे. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर गुरुवारी अंतिम निर्णय दिला.
हेही वाचा-आर्यन खानच्या सुटेकचा आनंद; चाहत्यांनी शाहरुखच्या निवासस्थानी मन्नत बाहेर फोडले फटाके