महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आयडॉलचे पदवी व पदव्युत्तर प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचे प्रवेश उद्यापासून होणार सुरू - Idol Course Admission first year Mumbai

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या १७ अभ्यासक्रमास युजीसी - डीईबीने शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ च्या प्रवेशासाठी नुकतीच मान्यता दिली आहे. यानुसार आयडॉलच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश उद्यापासून सुरू होत आहेत.

आयडॉल पदवी पदव्युत्तर प्रथम वर्ष अभ्यासक्रम प्रवेश
Idol Course Admission first year Mumbai

By

Published : Oct 26, 2021, 8:02 PM IST

मुंबई -मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या १७ अभ्यासक्रमास युजीसी - डीईबीने शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ च्या प्रवेशासाठी नुकतीच मान्यता दिली आहे. यानुसार आयडॉलच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश उद्यापासून सुरू होत आहेत. मागील वर्षी कोरोनाची साथ असतानाही आयडॉलमध्ये १५ अभ्यासक्रमांमध्ये ६४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. आयडॉलमध्ये यूजीसीच्या निर्देशानुसार सीबीसीएस सत्र पद्धत सुरू करण्यात आलेली आहे.

हेही वाचा -मुंबईमधील १० हजार सोसायट्यामध्ये १०० टक्के लसीकरण पूर्ण

आयडॉल लवकरच प्रवेश परीक्षा घेणार

पदवीस्तरावरील प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी आयटी या अभ्यासक्रमांचे प्रवेश उद्यापासून सुरू होत असून, प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२१ आहे. हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

यावर्षी यूजीसीने मुंबई विद्यापीठाला बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, एमए भूगोल व एमएमएस - एमबीए या तीन नवीन अभ्यासक्रमांना परवानगी दिली आहे. एआयसीटीई व यूजीसीने आयडॉलला एमएमएस - एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमाला दूरस्थ माध्यमातून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यानुसार एमएमएस - एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमांसाठी आयडॉल लवकरच प्रवेश परीक्षा घेणार आहे. एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस - एमबीएसाठी ७२० जागा, तर एमसीएसाठी २ हजार जागांना मान्यता दिली आहे.

विभागीय उपकेंद्रावर मार्गदर्शन -

आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण व रत्नागिरी येथे विभागीय केंद्रे असून या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. लवकरच सावंतवाडी व पालघर येथेही विभागीय केंद्र सुरू होत आहे. तसेच, विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून गुणपत्रिका देखील या उपकेंद्रावर मिळतील.

शिक्षणाची एक संधी उपलब्ध -

आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले की, बारावी उत्तीर्ण झालेल्या पण ज्यांना नियमित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला नाही व जे विद्यार्थी बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत त्याच्यासाठी व उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आयडॉलने शिक्षणाची एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा -एसटीप्रवास दरवाढ : उद्या (बुधवारी) एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर बेमुदत उपोषण

ABOUT THE AUTHOR

...view details