मुंबई -मुंबईमध्ये एखादा कार्यक्रम सभागृहात करायचा झाल्यास त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. यासाठी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील सभागृह सुट्टीच्या दिवशी नाममात्र दरात मुंबईकरांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र नगरसेवकांनी अशी सभागृहे लग्न, साखरपुडा, मुंज अशा धार्मिक कार्यक्रमास दोन सत्रात दिली जावीत अशी मागणी केली होती. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीने वारंवार प्रशासनाकडे पाठवल्यानंतरही त्याला प्रशासनाने नकार दिला आहे.
Mumbai Municipal Corporation : पालिका शाळांमधील सभागृहे दोन सत्रात भाडेतत्वावर देण्यास प्रशासनाचा नकार - बीएमसी महापालिका शाळा
पालिकेचे शाळेचे सभागृह ( BMC municipal schools ) हे उन्हाळी, दिवाळीची सुट्टी, सार्वजनिक सुट्टी व रविवार या दिवशी भाड्याने दिले जाते. पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक किंवा पालिकेच्या क व ड वर्गातील कर्माचाऱ्यांना कार्यक्रमासाठी सभागृह भाडयाने दिले जाते.
पालिका शाळांमधील सभागृहे कार्यक्रमासाठी -
महानगरपालिकेच्या शाळेतील सभागृह लग्न, साखरपुडा, मुंज अशा कार्यक्रमासाठी देण्याबाबत सर्वसामान्यांमधून मागणी होऊ लागल्यानंतर पालिकेने सन २०१३ मध्ये याबाबत एक धोरण तयार केले होते. पालिकेचे शाळेचे सभागृह हे उन्हाळी, दिवाळीची सुट्टी, सार्वजनिक सुट्टी व रविवार या दिवशी भाड्याने दिले जाते. पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक किंवा पालिकेच्या क व ड वर्गातील कर्माचाऱ्यांना कार्यक्रमासाठी सभागृह भाडयाने दिले जाते. त्याकरीता सभागृहाच्या क्षेत्रफळानुसार भाडे व अनामत रक्कमही ठरवण्यात आली आहे. तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या व मोठी दुरुस्ती केलेल्या १२ शाळांचे सभागृह दुप्पट दराने उपलब्ध करून दिले जाते. मात्र, शाळेचे सभागृह मिळण्यासाठी लोकांची मागणी वाढत असल्यामुळे सभागृह दोन सत्रात देण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती.
प्रशासनाने मागणी फेटाळली -
महापालिका शाळेचे सभागृह मिळण्यासाठी लोकांची मागणी वाढत असल्यामुळे सभागृह दोन सत्रात देण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. सभागृह भाड्याने देताना सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत संपूर्ण दिवसाकरीता उपलब्ध करून दिले जाते. मात्र १० ते ३ व नंतर पुन्हा संध्याकाळी ४ ते रात्री १० या कालावधीसाठी सभागृह दिल्यास मधल्या एका तासात सभागृहाची स्वच्छता करणे अशक्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पालिकेच्या धोरणानुसार सभागृहाच्या स्वच्छतेची जबाबदारी ही त्या शाळेतील माळी आणि देखभालीसाठी ठेवलेल्या व्यक्तीवर असते. मात्र एकच व्यक्ती एका तासात संपूर्ण सभागृहाची स्वच्छता करू शकत नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीने वारंवार प्रशासनाकडे पाठवल्यानंतरही त्याला प्रशासनाने नकार दिला आहे.
हेही वाचा - पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मोदी आम्ही पाहिले.. मग तुम्हाला काय हिजबूल जनता पक्ष म्हणायचे का? उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार