महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aditya Thackeray walk Out : एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला; आदित्य ठाकरेंनी केले 'वॉकआऊट' - लेटेस्ट आदित्य ठाकरे न्यूज

एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर भाजपसह शिंदे गटाच्या आमदारांनी सदनात प्रचंड घोषणाबाजी केली. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे हे युतीचे मुख्यमंत्री असल्याचे सांगितल्याने आमदारांना अधिकच जोर आला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी सदनातून बाहेर जाणे पसंत केले.

Aditya Thackeray
युवासेना नेते आदित्य ठाकरे

By

Published : Jul 4, 2022, 12:46 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. बहुमत चाचणी जिंकल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडून युती सरकारच्या घोषणा देण्यात आल्या. मात्र या घोषणा देताच सभागृहात असलेल्या आदित्य ठाकरे यांनी सभागृहातून ( Aditya Thackeray walk Out ) बाहेर पडणे पसंत केले. घोषणा सुरू होताच एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी सर्वात आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी हे सरकार शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार असल्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शिवसेनेच्या सामान्य सैनिकाला मुख्यमंत्री केले -देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला भाजपसह बहुमत मिळाले होते. मात्र राज्यात अनैसर्गिक सरकार आणले गेले. म्हणून पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेच्या सामान्य सैनिकाला मुख्यमंत्री केले आहे. मी पुन्हा येईन, असे म्हटलो होतो, त्यामुळे माझी खूप टिंगल करण्यात आली. पण आपण सर्वांना माफ केले. या सत्तेला सर्वांनी मोकळ्या मनाने स्वीकार केला पाहिजे. मी पुन्हा आलो आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन आलो असेही ते यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details