मुंबई - नवीन वर्षाच्या सुरवातीला सर्व काही पूर्वपदावर येताना दिसत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे द्वारे बैठक घेण्याचे टाळून अनेक दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीला जातीने हजर राहात आहेत. या बैठकीमध्ये मुंबई लोकल, लसीकरण, कोरोना प्रादुर्भाव यावर चर्चा होणार आहे. ही बैठक होण्याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची प्री कॅबिनेट बोलवत होमवर्क घेतल्याने अनेकांचे भुवया उंचावल्या आहेत.
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात बदलती शिवसेना
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात आदी मंत्री उपस्थित आहेत. ही बैठक होण्याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्यावर शिवसेना मंत्री आमदारांची एक बैठक पार पडली या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, आमदार प्रताप सरनाईक व आदी आमदार उपस्थित होते. या बैठकीत कॅबिनेटमध्ये मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांवर आधी चर्चा करण्यात आली. काँगेस आणि राष्ट्रवादी एखाद्या बैठकी अगोदर अशाप्रकारे बैठका घेतात मात्र शिवसेनेने असा प्रकारची बैठक कधी घेतली नव्हती. शिवसेनेमध्ये अशी परंपरा नव्हती मात्र युवा नेते आदीत्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बदल होताना दिसत या आहेत.
हेही वाचा -सरकारने मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे - विनोद पाटील