महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aditya Thackeray On Mumbai Devlopment : मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध - मंत्री आदित्य ठाकरे - आदित्य ठाकरे मुंबई विकास

मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी ( Mumbai Devlopment ) आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी केले. मुंबईकरांपेक्षा कोणी मोठा नाही, नागरिकांच्या प्रतिसादानंतर ऊर्जा मिळते, असेही ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray On Mumbai Devlopment
Aditya Thackeray On Mumbai Devlopment

By

Published : Feb 10, 2022, 1:22 AM IST

मुंबई -मुंबईतील रस्ते, पदपथ, पाणी, वाहतूक बेट ही सर्व कामे करण्यासाठी म्हणजेच मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी ( Mumbai Devlopment ) आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी केले. मुंबईकरांपेक्षा कोणी मोठा नाही, नागरिकांच्या प्रतिसादानंतर ऊर्जा मिळते, असेही ठाकरे म्हणाले.

मुंबईकरांपेक्षा कोणी मोठा नाही-

ताडदेव येथील वसंतराव नाईक चौकातील वाहतूक बेटाच्या सुशोभीकरण कामाचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते (९ फेब्रुवारी २०२२ रोजी) ताडदेव येथील वसंतराव नाईक चौकात पार पडले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, मुंबईकरांसाठी सर्व पक्षीय मतभेद बाजूला सारून आजच्या या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित आहे. मुंबईकरांपेक्षा कोणी मोठा नसून मुंबईकरांचा आवाज हा सर्वात मोठा आहे. विकास कामे करीत असताना हा विभाग, प्रभाग तसेच कुठल्या पक्षाचा नगरसेवक आहे, हा भेदभाव न करता मुंबईकरांची कामे करीत आहोत, असे ठाकरे म्हणाले.

नागरिकांच्या प्रतिसादानंतर ऊर्जा मिळते -

आज जी उत्तर विभागामध्ये ज्या कामांचे लोकार्पण करण्यात आले आहे. ही कामे देशातील नागरिक येऊन बघतील, अशा पद्धतीने आपण केली आहेत. जोपर्यंत चांगले रस्ते, फुटपाथ, वाहतूक बेट आपण तयार करणार नाही, तोपर्यंत चांगला व्यवसाय मुंबईत येणार नाही. मुंबईच्या शाश्वत विकासाची कामे आपण पुढे नेत आहोत. या सर्व कामांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्हाला शक्ती ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदित्य ठाकरे यांच्याहस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर फीत कापून वाहतूक बेटाचे लोकार्पण करण्यात आले.

हेही वाचा -Maharashtra Unlock : आरोग्य मंत्री टोपे म्हणाले - 'या' महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र अनलॉक होण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details