मुंबई - राज्य विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ( Chief Minister Eknath Shinde ) विश्वासदर्शक ठराव बहुमताने संमत झाल्यानंतर बंडखोर आमदार विधानभवनाच्या आवारात मुक्तपणे वावरताना ( rebel MLA of Shivsena ) दिसले. दरम्यान, मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे ( Magathane MLA Prakash Surve ) आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे ( ShivSena leader Aditya Thackeray ) यांची मीडिया सेंटरजवळ समोरासमोर आले. आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रकाश सुर्वे यांना चांगलेच फैलावर घेतले. तुमच्यावर विश्वास होता, आणि तुम्ही विश्वासघात केला याचे सर्वाधिक वाईट वाटते, असे ठाकरे म्हणाले.
शिवसेनेविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदारांमध्ये सोमवारी सकाळी आणखी एका आमदाराची भर पडली. उद्धव ठाकरे गटातील आमदार संतोष बांगर ( MLA Santosh Bangar ) हे एकनाथ शिंदे गटात सामील ( Eknath Shinde group ) झाले. शिंदे सरकारने १६४ विरुद्ध ९९ च्या फरकाने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. दरम्यान विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहाबाहेर शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांची भेट झाली. प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभेतील शिवसेनेचे आमदार आहेत. शिंदे गटासोबत बंड पुकारणाऱ्या ४० आमदारांपैकी ते एक आहेत.
मला स्वत:ला याचे दुःख झाले-आदित्य आणि सुर्वे समोरासमोर येताच प्रसारमाध्यमांनी त्यांना गराडा घातला. मात्र आदित्य ठाकरे यांनी थेट सुर्वे यांना गाठून, एवढे जवळचे असून… काय सांगणार आपण मतदारसंघाला? तुम्ही असे कराल असं केव्हाच वाटलं नव्हते. माझे तुमच्यावर खरोखर प्रेम होते, हे तुम्हाला पण माहित आहे. मला स्वत:ला याचे दुःख झाले, अशा शब्दात खडे बोल सुनावले. अवघ्या १२ ते १५ सेकंदांत आदित्य ठाकरे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. दरम्यान, सुर्वे यांनी केवळ मान हलवून प्रतिसाद दिला.
व्हिपचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई-व्हिपचे उल्लंघन करणाऱ्यावर नक्कीच कारवाई करण्यात येणार आहे. आमचा जो व्हिप आहे तो अजून कायम आहे. जे आमदार जन्म पक्षात असे (दगा) करु शकतात, ते कर्म पक्षातही असे करु शकतात. शरद पवारांनी नुकतेच लवकरत निवडणूक होईल तयारीला लागा, असे सांगितले होते. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, मध्यवर्ती निवडणुकीसाठी शिवसेना हा पुर्ण तयारी निशी तयार आहे. शिवसेना यापेक्षा जास्त आमदारांसह पुन्हा विधानसभेवर भगवा फडकवेल अशा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.