Aditya Thackeray on Yakub Menon controversy दहशतवाद्याचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात का दिला? आदित्य ठाकरे यांनी भाजपला फटकारले
मुंबईतील 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननच्या कबरीवरून वाद सुरू आहे. भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपांचे रान उठवले आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देत नाहीत. हा सरकारचा नियम आहे. पण भाजप सरकारने याकूब मेमनचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात का दिला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
मुंबई - मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी याकूब मेमन याच्या कबरीवरून भाजपने शिवसेनेसहित महाविकास ( Aaditya Thackeray slammed BJP ) आघाडीवर आरोपांचा भडिमार सुरू केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांनी तोंडसुख घेतले. युवा सेना प्रमुख आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला यावरून जोरदार फटकारले. दहशतवाद्याचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात का दिला, असा सवाल ही यावेळी उपस्थित केला. आरोप करताना सत्यता तपासा असा सल्लाही भाजप नेत्यांना ( Yakub Menon grave controversy ) दिला आहे.
मेमनचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात का दिलामुंबईतील 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीयाकूब मेननच्या कबरीवरून वाद सुरू आहे. भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपांचे रान उठवले आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देत ( Aditya Thackeray slammed BJP over Yakub ) नाहीत. हा सरकारचा नियम आहे. पण भाजप सरकारने याकूब मेमनचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात का दिला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला. याकूब मेमनची अंत्ययात्रा आणि अंत्यविधीसाठी तत्कालीन भाजप सरकारने परवागनी कशी दिली, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांना सुनावले.
समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नयाकूब मेमनच्या कबरीचा आणि पालिकेचा काहीही संबंध नाही. स्वत:च्या चूकीचे खापर दुसऱ्याचा डोक्यावर फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ती जागा खाजगी ट्रस्टची आहे. याकूब मेमनचा दफन विधी झाला तेव्हा भाजपचे सरकार होते. त्यावेळी दहशतवाद्याचा दफन विधीला सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला. कसाबप्रमाणे याकूब मेमनला दहशवाद्यासारखी वागणूक का नाही दिली, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. विरोधकांकडून खालच्या पातळीचे राजकारण सुरु आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. राजकारण करतानाही पातळी ठरवायला हवी. धार्मिक प्रकरणावरून वाद निर्माण करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
कितीही नाव ठेवली तरी; कामगिरी अभिमानास्पदभाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांचा पेग्विन सेना असा उल्लेख केला. या टीकेलाही आदित्य ठाकरे यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले. मुंबईत पेंग्विन आणले याचा आम्हांला अभिमान आहे. पेंग्विन आणण्यापूर्वी जिजामाता उद्यानाला आर्थिक तोटा सोसावा लागत होता. पेंग्विन आणल्यानंतर जिजामाता उद्यान सुरळीत सुरु झाले आहे. दररोज सुमारे तीस हजार लोक उद्यानाला भेट देत आहेत. आम्ही नुकसान भरून काढले. त्यामुळे कितीही नावे ठेवली तरी आम्ही अभिमानास्पद कामगिरी केली हेच खरं आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.