महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Omicron virus threat in Maharahstra : विदेशातून आलेल्या १ हजार पर्यटकांचा शोध सुरू - आदित्य ठाकरे - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ओमीकॉर्न आढावा बैठक

युरोपमधील काही देशांत कोरोनाचा प्रसार वाढला आहे. दक्षिण आफ्रिका व काही देशांत ओमीक्रोन हा व्हेरियंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे पालक मंत्री व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, की मागील दहा दिवसात १ हजार विदेशी नागरिक विमानाने आले आहेत. त्यापैकी मुंबईमध्ये किती नागरिक आहेत, त्यांचा शोध ( search of thousand foreigner tourists ) घेतला जात आहे.

Omicron virus threat in Maharahstra
Omicron virus threat in Maharahstra

By

Published : Nov 29, 2021, 4:31 PM IST

मुंबई - दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रोन या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत विदेशातून आलेल्या एक हजार नागरिकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पर्यटन व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

युरोपमधील काही देशांत कोरोनाचा प्रसार वाढला आहे. दक्षिण आफ्रिका व काही देशांत ओमीक्रोन हा व्हेरियंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे पालक मंत्री व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयात आढावा ( Aditya Thackeray meeting on omicron virus precautions ) बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, की मागील दहा दिवसात १ हजार विदेशी नागरिक विमानाने आले आहेत. त्यापैकी मुंबईमध्ये किती नागरिक आहेत, त्याचा शोध घेतला जात आहे. त्यांना क्वारंटाईन करण्याचा विचार सुरू आहे. केंद्र सरकारचे निर्देश आल्यास त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा-Health Minister Rajesh Tope : अफ्रिकेतील विमानांवर मुंबईत बंदी घालण्याची आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी



लशींचे डोस घ्या -
मुंबईमध्ये कोरोना आणि नवीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ( omicorn variant in Maharashtra ) लसीकरण केले जात आहे. मुंबईत पहिल्या लशींचे १०२ टक्के डोस देण्यात आले आहेत. ७२ टक्के नागरिकांना लशींचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. जे लशींचे डोस आहेत, त्यामधून १५ जानेवारीपर्यंत्त मुंबईकरांना लशींचे दोन्ही डोस देऊन पूर्ण लसीकरण करू, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ओमीक्रोनचा धोका वाढल्यावर लशींचे डोस घ्यायला गर्दी होत आहे. त्यामुळे ज्यांनी लस घेतली नाही, अशा नागरिकांनी लसीचे डोस घ्यावेत असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

हेही वाचा-measures for foreign travelers : केद्र सरकारचे परदेशी प्रवाशांसाठीचे मार्गदर्शक तत्व जारी



भिऊ नका पण काळजी घ्या -
ओमीक्रोनचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरण करता यावे यासाठी केंद्र सरकारकडे लसीकरणामधील कालावधी कमी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. कोरोनच्या नव्या विषाणूपासून आपला बचाव करण्यासाठी मुंबईकरांनी मास्क घालावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. सर्व नियम पाळून शाळा सुरू केल्या आहेत. नागरिकांनी भीती बाळगू नये असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.

हेही वाचा-Omicron Corona Variant : दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवली आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

आढावा बैठकीला पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details