मुंबई : राज्यात वाढत असणारी कोरोनाची रुग्णसंख्या हे तिसऱ्या लाटेचे संकेत आहे ( Aditya Thackeray On Corona Third wave ). त्यापार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी निर्बंध लावले जात आहेत, तेथील आस्थापणांनी नियमांचे पालन करावे. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापणांना सिल करण्याचे निर्देश, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येवर उपाययोजना आखण्यासाठी मुंबई महापालिका मुख्यालयात महत्वाची बैठक पार पडली ( Mumbai Corona Meeting ). या बैठकीला महापालिका आयुक्त इक्बाल चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, पालिका सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
फ्रंट वर्कर्सना बुस्टर डोस
आदित्य ठाकरे म्हणाले, मागील आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढत आहे. शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय अद्याप कोणताही निर्णय नाही. पालक, डॉक्टरांकडून सूचना मागवत आहोत. आता तरी निर्बंध लावलेत, त्यात वाढ केलेली नाही. गरज पडल्यास पुढच्या आठवड्यात राज्य सरकार योग्य निर्णय घेईल. सरसकट लसीकरणाची मोहीम शासनाने हाती घेतली असून, 3 तारखेपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल. तसेच, फ्रंट वर्कर्सना बुस्टर डोस ( Front line Worker Booster Dose ) देण्याचे नियोजन देखील आखले आहे.
तिसऱ्या लाटेची शक्यता
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सार्वजनिक ठिकाणी, टेरेस, हाऊस पार्ट्यांना बंदी असेल ( Aditya Thackeray On New Year Celebration). कोणाला ही परवानग्या दिलेल्या नाहीत. घरी, सोसायट्यांमध्ये पार्ट्या करताना, काळजी घ्या. नागरिकांनी त्रिसुत्री नियमांचे पालन करा, असे आवाहन करत, ओमायक्रॉन बाबत गंभीरता बाळगणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जाणार नाही. त्या सोसायट्या सील केल्या जातील. यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जाईल. वाढती रुग्णसंख्या पाहता, तिसऱ्या लाटेची ही सुरुवात असल्याती भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे.
राज्यपालांच्या प्रश्नांवर चुप्पी
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला परवानगी देण्यावरून ठाकरे सरकार विरुध्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagatsingh Koshyari ) असा वाद रंगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray ) यांनी पाठवलेल्या पत्राला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही तिखट उत्तर दिले. तुमच्या धमकीवजा पत्रामुळे मी निराश झालोय, तसेच परवानगी देण्यासाठी तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाहीत, असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी बोलणे टाळले आहे.
हेही वाचा -Police Notice To Narayan Rane : नारायण राणे हाजीर हो.. कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी बजावली नोटीस