महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेनेच्या 'भावी मुख्यमंत्र्यांना' 'जन आशीर्वाद' मिळणार का? - विधानसभा निवडणूक

'मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे', असे बोलत शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात केली. 18 जुलैला जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यापासून सुरू केलेली ही यात्रा सध्या चौथ्या टप्प्यात आहे. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या हाती या यात्रेतून नेमकं काय लागलंय? याचा घेतलेला हा आढावा ..

आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रा

By

Published : Sep 24, 2019, 3:01 PM IST

Updated : Sep 24, 2019, 10:51 PM IST

मुंबई -जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरेंनी राज्यातील विविध भागांचा दौरा केला. आपल्या प्रत्येक टप्प्यात बोलताना आदित्य यांनी बेरोजगारीमुक्त, कर्जमुक्त, प्रदुषणमुक्त, दुष्काळमुक्त, सुरक्षित आणि सुशिक्षित महाराष्ट्र घडवायचा आहे. हे आपले एकट्याचे काम नाही त्यासाठी तुमची साथ गरजेची आहे, असे भावनिक आवाहन जनतेला केले. यामुळेच त्यांच्या या यात्रेला प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिवसेनेच्या 'भावी मुख्यमंत्र्यांना' 'जन आशीर्वाद' मिळणार का?

महाराष्ट्रात काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने घोषणा करण्याच्या कित्येक दिवस अगोदरपासूनच राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. यावर स्वार होत अनेक पक्षांनी आपल्या प्रचार अभियानाला सुरुवात देखील केली. यात सर्वात जास्त आघाडीवर होती, ती शिवसेना आणि त्या पक्षाचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभर प्रचार करण्यासाठी आणि जनतेपर्यंत पोहचण्यासाठी 'जन आशिर्वाद यात्रा' काढली आहे. मात्र, आपली जन आशीर्वाद यात्रा ही प्रचारासाठी आहे, असा मुद्दा बनू नये यासाठी त्यांनी 'लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला ज्यांनी मत दिले त्यांचे आशिर्वाद घ्यायला, तर ज्यांनी सेनेला मत दिले नाही त्यांचा विश्वास जिंकायला मी येत आहे', असं सांगत आपल्या या यात्रेचा प्रवास केला आहे. यानंतर जळगावपासून ते आता चौथ्या टप्प्यातील पालघर पर्यंत प्रत्येक टप्प्यात केलेल्या अनेक सभांतून त्यांनी या मताचा सातत्याने पुनरूच्चार केला.

यात्रेतून युवा नेतृत्व म्हणून राज्यभर प्रतिमा बांधणी

हेही वाचा... शिवसेनेला मत न देण्याऱ्यांनाही आपलेसे करण्याचा प्रयत्न करणार - अदित्य ठाकरे

राज्याच्या राजकारणातील मुख्य प्रवाहात सामील

सुरूवातीपासूनच आदित्य यांच्या जन आशीर्वाद यात्रेला कार्यकर्त्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. कधी ढोल-लेझीम, कधी पारंपारिक वेषभुषेत स्वागत करणे असेल, बॅनरबाजी करणे अशा अनेक मार्गांनी जन आशिर्वाद यात्रेला नेहमी चर्चेत ठेवण्यात आले. पण यात आदित्य यांची देखील माघार नव्हती. त्यांनी देखील आपल्या भाषणात राज्याच्या प्रश्नांवर बोण्यास सुरूवात केली. काही वेळा महत्वाच्या विषयांना सभेत थेट हात घातला, यामुळे राज्याच्या मुळ राजकारणात ते चर्चेत राहिले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणजे त्यांची राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून होत असलेली चर्चा.

जन आशीर्वाद यात्रेतून जमिनीवरचं वास्तव जाणून घेता आले

मुख्यमंत्री पदाचा उमेदवार प्रतिमेची कार्यकर्त्यांकडून निर्मीती

जन आशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंच्या पदरी पडलेले सर्वात मोठे दान म्हणजे, शिवसेना आणि कार्यकर्ते यांनी स्वतः आदित्य यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार स्विकारणे. बुलढाणा येथे जन आशीर्वाद यात्रा आली असता, तेथील शिवसैनिकांनी भावी मुख्यमंत्री अशा नावाने बॅनर लावत, आदित्य यांचे स्वागत केले होते. यानंतरही संजय राऊत व सेनेच्या इतर मोठ्या नेत्यांनी राज्याचे भावी मुख्यमंत्री हे आदित्य ठाकरे असावेत, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे, असे बोलत या मुद्द्याला पुष्टी दिली. राज्यात सेना आणि भाजप यांचे एकत्रीत सरकार आहे. देवेंद्र फडणवीस हे युती सरकारचे मुख्यमंत्री आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीनंतरही देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असे भाजप सांगत असताना, आदित्य यांचा मुख्यंत्री पदाचे उमेदवार हा प्रचार तसा धाडसाचाच.

जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरेंनी राज्यातील विविध भागांचा दौरा केला

हेही वाचा... 'इलाका हमारा-धमाका हमारा'; पालघरमधील गुंडागर्दी मोडून काढू - आदित्य ठाकरे

यात्रेतून जमिनीवरचं वास्तव जाणून घेता आले

आदित्य यांनी जन आशीर्वादच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. या दरम्यान अनेकांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या. सर्वसामान्य जनता, लहान-मोठे, युवक-बालक, वयोवद्ध, महिला, तरूण-तरूणी अशा सर्व वयोगटातील लोकांशी त्यांनी या काळात मुक्त संवाद साधला. त्यांची जन आशीर्वाद यात्रा जिथे जिथे जाईल तिथे त्यांना लोकांसोबत बोलता यावे, यासाठी सभांचे आयोजन करण्यात आले. लोक देखाल त्यांच्या सोबत बोलत आणि आपल्या समस्या खुलेपणाने मांडत. काही प्रश्नांचे निराकारण आदित्य यांनी आपल्या सभेत लोकांच्या समोर केल्याचे दिसून आले. यामुळे त्यांना लोकांचा एक पाठिंबा प्राप्त होऊ लागला आहे. जन आशिर्वाद यात्रेचे आदित्य यांना मिळालेले हे सर्वात महत्वाचे फलित आहे. त्यांना महाराष्ट्र जवळून पाहता आला, आणी जनतेलाही आदित्य यांची जवळून ओळख झाली. काहीवेळा आदित्य अडखळलेही होते. पण त्यातून सावरण्याची कला त्यांनी आत्मसात केल्याचेही दिसून आले.

जन आशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंच्या हाती नेमकं काय ?

यात्रेतून युवा नेतृत्व म्हणून राज्यभर प्रतिमा बांधणी

या संपूर्ण यात्रेत एक गोष्ट सातत्याने चर्चेत राहिली. ती म्हणजे आदित्य ठाकरे यांची लाईफ स्टाईल. जनतेत मिसळत असतानाही एखाद्या जून्या नेत्याच्या पेहरावात न जाता, एखाद्या सामान्य युवकाप्रमाणे ते जात होते. शर्टइन करून, राखलेली दाढी अशा पेहरावात जनतेत मिसळत त्यांनी आपली प्रतिमा एक युवा नेतृत्व असी अशी केली. लोकांनाही त्यांना एक युवा नेतृत्व म्हणून स्विकारलेले दिसून आले.

हेही वाचा... पालघर : आदित्य ठाकरेंच्या 'जनआशीर्वाद'साठी एका रात्रीत बुजवले रस्त्यांवरील खड्डे

सत्तेत असूनही सरकारच्या चुका दाखवल्याने 'स्पष्ट वक्त्तृत्वाचा नेता' अशी ओळख

जन आशीर्वाद यात्रेत ठिकठिकाणी झालेल्या सभेत आदित्य यांनी सातत्याने सरकारच्या चुकांवर बोट ठेवले. सरकारच्या अनेक योजना ज्या लोकांपर्यंत पोहचल्याच नाहीत, याचा उल्लेख आदित्य यांनीच केला. कर्जमाफीच्या बाबत एकीकडे मित्रपक्ष भाजप यशस्वी ठरल्याचा प्रचार करत असताना, दुसरीकडे आदित्य यांनी कर्जमाफी मिळाली नाही, हे सांगण्याचे धाडस करणाऱ्या शेतकऱ्याचा आपल्या सभेत जाहीर सत्कार करत, लोकांमध्ये आपली प्रतिमा स्पष्ठ बोलणारा आणि खरे बोलणारा नेता अशी करण्याचा प्रयत्न केला. याला कितपत यश आले हे येत्या काळात दिसून येईलच.

जन आशीर्वाद यात्रा हि शिवसेनेसाठी निश्चितच महत्वाची आहे. त्याहून महत्वाची आहे, ती आदित्य ठाकरें यांच्यासाठी. मुंबईत शिवसेनेच्या कार्यकारिणीत आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. शिवसेनेत नेता हे एक महत्त्वाचे पद आहे. आदित्य गेल्या पावणे सहा वर्षांपासून राजकारणात आहेत. भविष्यात त्यांचे नेतृत्व कसे असेल, याविषयीचा अंदाज त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरून बांधता येऊ शकतो. मात्र जन आशिर्वाद यात्रा हि त्यांच्या राजकीय जडण घडणीसाठी महत्वाचा टप्पा नक्कीच ठरेल, यात शंका नाही.

हेही वाचा... शरद पवारांची एक रॅली अन् सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर ?

Last Updated : Sep 24, 2019, 10:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details