मुंबई -गोरेगाव मुलूड जोडरस्ता प्रकल्प उड्डाण पुलाचे ( Goregaon Mulud Link Road Project ) भूमिपूजन पालकमंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्या हस्ते करण्यात आले. गोरेगाव ते मुलूंड 12 किलोमीटर पाच पदरी रस्ता असणार आहे. 666 कोटीचा हा ( Goregaon Mulud Link Road Project Cost ) प्रकल्प आहे. गोरेगाव पूर्व मुलूंड हायवेला हा उड्डाणपूल जोडला जाणार आहे. चित्रनागरी गोरेगाव इथे 4.7 किमी लांबीचे 2 बोगदे सुद्धा असणार आहेत. गोरेगाव ते मुलूंडसाठी आता एक तासाहून जास्तीचा लागणारा वेळ आता 20 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
Goregaon Mulud Road Inauguration : गोरेगाव-मुलूड जोडरस्ता प्रकल्पाचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमीपूजन - आदित्य ठाकरे गोरेगाव भूमीपूजन
गोरेगाव मुलूड जोडरस्ता प्रकल्प उड्डाण पुलाचे ( Goregaon Mulud Link Road Project ) भूमिपूजन पालकमंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्या हस्ते करण्यात आले. गोरेगाव ते मुलूंड 12 किलोमीटर पाच पदरी रस्ता असणार आहे. 666 कोटीचा हा ( Goregaon Mulud Link Road Project Cost ) प्रकल्प आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले? -मुंबईत किलोमीटरपेक्षा वेळेला महत्व आहे. गोरेगाव मुलूंड दोन्हीकडून रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. या नव्या रस्त्यावर सायकल ट्रॅक असेल. तसेच यासाठी संजय गांधी पार्कमधील एकही झाड तोडले जाणार नाही. या रस्त्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, अशी माहिती पर्यावरमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच मुंबई नालेसफाईवर आमचे लक्ष आहे. मुख्यमंत्रीही स्वतः लक्ष ठेवून आहेत. मोगरा, माहुल नाला याचे काम केले जात आहे. यंदा पाणी तुंबणार की नाही, हे सांगता येणे कठीण आहे. मात्र, 100 किंवा 50 मिली पाऊस असेल तर पाणी तुंबणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे, असेही ते म्हणाले.