मुंबई -भारतीय समूह वेदांत आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील दिग्गज फॉक्सकॉनने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले एफएबी उत्पादन कंपनी स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. मात्र, हा प्रकल्प महाराष्ट्रात प्रस्तावित असताना इतका मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेलाच कसा (Aditya said losers called Khoka government)? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे सरकार महाराष्ट्रातून उद्योग गुजरातमध्ये नेत असल्याचा आरोप पत्रकार परिषद घेत केला आहे. तर, 'हार के जीतने वाले को बाजीगर कहते है पण इथ जितके हारनेवाले को खोके सरकार कहते है' (losers called Khoka government) असं म्हणत शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.
आमचं शिष्ठमंडळ काम करत होतं -यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वेदांता प्रकल्प का नाही आला याबद्दल सरकार कडून कोणतंही खुलासा आला नाही. फक्त आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण, हा प्रकल्प महाराष्ट्रात का नाही आला हे सांगत नाहीयेत. माझं आज सकाळी सुभाष देसाई यांच्याशी बोलणं झालं. आमच्या शिष्ठमंडळ काम करत असताना साधारण जून महिन्यात 40 गद्दारांनी आपलं सरकार पाडलं आणि त्या प्रकल्पाचं काम राहील. पण, त्यानंतर तो प्रकल्प दुसरीकडे का गेला हे सुद्धा कोणी सांगत नाहीये. बल्क पार्क देखील गुजरात मध्ये जातं आहे. असं आदित्य यांनी म्हटलं आहे.