मुंबई -शिवसेनेतील बंडखोरीच्या क्रांतीची ३३ देशांनी दखल घेतल्याचे ( Aditya Thackeray criticized rebel MLA in Mahim Thane ) वक्तव्य शिंदे गटाकडून करण्यात आले होते. युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray visit mahim ) यांनी यावरून बंडखोरांवर टीकेची तोफ डागली. ३३ देशांनी बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला. माहीम कोळीवाडा येथील शाखा क्रमांक १८२ ला भेट देत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. जॉगिंग ट्रॅकचे यावेळी त्यांनी उद्घाटन केले.
हेही वाचा -Breaking : निलेश राणेंनी दीपक केसकरांची उडविली खिल्ली, म्हणाले...
50 चा बार आहे तो आधीच फुटला, आता फुटणार नाही - माहीमने वाढवले, मोठे केले ते फुटले. त्याबद्दल वाईट वाटते. ज्यांना जायचे होते ते गेले, आता नवीन लोकांना संधी देणार. गरजेपेक्षा जास्त दिले त्याचे अपचन झाले म्हणून हाजमोला खाण्यासाठी ते तिकडे गेल्याची टीका बंडखोर आमदार सदा सरवणकर यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रात चांगचे सुरू होते, हे बघवले नाही म्हणून फुटले. उद्धव साहेबांसारख्या चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. कोरोना काळात चांगले काम केले. जातीय वाद झाले नाहीत. महाराष्ट्र पुढे जात होता. तेव्हा विरोधकांना महाराष्ट्र पुढे जात आहे त्याला अडवायला सुरुवात केली, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचे शाखेत आगमन झाले तेव्हा फटाक्यांची आतषबाजी झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी फटक्यांवरून गद्दारांवर उपहासात्मक टोला लगावला. 50 चा बार आहे तो आधीच फुटला आहे. जे फुटायचे होते ते फुटले, आता कोणी नाही फुटणार, असे आदित्य ठाकरेंनी विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम या गद्दारांनी रोखले - राज्यपाल यांनी महात्मा फुलेंविषयी वक्तव्य केले होते. नुकतेच त्यांनी मुंबई ठाणे बद्दल वक्तव्य केले. मी बरेच राज्यपाल पाहिले, पण असे राज्यपाल पाहिले नाही. पी अलेक्झांडर पासून आतपर्यंत राज्यपाल झाले, पण असे राज्यपाल बघितले नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सरकार असताना आम्ही हजारो कोटींचे उद्योग महाराष्ट्रात आणले. उद्धव ठाकरे साहेबांनी कोरोना काळात चांगले काम केले. माहीमबद्दल बोलायचे झाले तर खूप काही बोलायला आहे. अनेक कामांच्या ठिकाणी माझ्या नावाचे फलक लावले नाही. आज आपले सरकार असते तर माहीम किल्ला पर्यटनासाठी खुला करून रोजगार उपलब्ध केला असता. अनेक गोष्टी आपण दादर माहीम येथे केल्या आहेत. महाराष्ट्र, मुंबई पुढे जात होती. महाराष्ट्र, मुंबईचा विकास अडवायचा विचार या बंडखोरांच्या मनात आला असावा. मुंबईचा विकास होतोय हे त्यांच्या पोटात दुखत होते. उद्या बेस्टला 75 वर्ष होत आहेत. आपण बेस्टचे तिकीट कमी केले. 5 किलोमीटर 5 रुपयात प्रवास असे आपण केले होते. महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम या गद्दारांनी रोखले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.