मुंबई -बाबरी मशीद पडली ( Babari Demolition ) तेव्हा मी तिथे होतो, असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnsvis ) यांनी करत शिवसेनेला डिवचले होते. यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray Criticized Devendra Fadnavis ) यांना विचारले असता, आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. १८५७ च्या लढाईत फडणवीसांचे योगदान असेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी -महाविकास आघाडी विरोधात भाजपने पोल-खोल सभा घेतल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनी बूस्टर डोस सभा घेत, शिवसेनेवर आगपाखड केली. तसेच बाबरी मशिद पाडल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. बाबरी मशीद शिवसेनेने नव्हे, तर भाजपच्या कारसेवकांनी पाडली. मी त्यावेळी हजर होतो, असा दावा केला. शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. बाबरीवरून दावे-प्रतिदावे, आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी पुन्हा झडत आहेत. मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य केले. १८५७ च्या लढाईत फडणवीसांचे योगदान असेल, असा खोचक टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.