मुंबई- केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह यांनी आज मुंबई दौरा ( Amit Shah Mumbai visit ) केला. यावेळी त्यांनी शिवसेनेने २०१४ मध्ये दोन सीटसाठी युती Shiv Sena broke the alliance तोडली, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा असे वक्तव्य केले आहे. यावर जो काही कट रचला होता तो आता समोर येत आहे तो समोर येत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे आणि किशोरी पेडणेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
तो कट समोर येत आहेअमित शाह यांनी केलेल्या आरोपावर आदित्य ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, की अमित शाह यांच्या या विधानावर मी काहीच बोलू शकत नाही. जो काही कट रचला होता तो आता समोर येत आहे. अमित शहा काय काय बोलले त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही. पण जे चाळीस लोक गेले आहेत, त्यांना या संदर्भात प्रतिक्रिया विचारा. मी सध्या सर्वत्र गणपतीचे दर्शन घेत आहे. प्रेम आणि आशीर्वाद लोकांचे घेऊन फिरत आहे. दोन जागांसाठी युती तुटली या त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर काय बोलायचं असे आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray criticized Amit Shah ) म्हणाले.
आसमानातून जमीन दाखविली पाहिजे, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया (Kishori Pednekar slammed BJP ) शिवसेनेनं १५० चा नारा यापूर्वीच दिला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वानं जर हाच नारा दिला असेल तर त्यांच्या नाऱ्यात आणि वास्तवात जमिन-आस्मानाचे अंतर आहे. अमित शाहांची अवस्था गजनी सारखी का झाली? अडीच वर्षांनंतर दोन जागांसाठी युती तोडली हा साक्षात्कार का झाला? स्थानिक, प्रादेशिक पक्ष संपवायचे हा अजेंडा सर्वांना कळला आहे. कोण कोणाला धोका देतंय, खोके देतंय, कोण कोणाचे बोके पळवतंय हे सगळं लोकांना दिसतंय. आम्ही जमिनीवरच आहोत अजुन आम्हांला काय जमिन दाखवताय. भाजपाला आसमानातून जमिन दाखवली पाहिजे. उद्धव ठाकरेंना एकटं पाडायचं, याकरता गट तट तोडायचे काम भाजप करत आहे. आम्ही दोन दिवसांपूर्वीच मुंबईकरता मिशन १५० नारा दिला आहे. त्यांना कॉपी कायचा असेल तर करु देत अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी दिलीय.