मुंबई -मुंबईसह महाराष्ट्रात हिंदुत्व, भोंगा आणि हनुमान चालीसा ( Aaditya Thackeray on Loudspeaker ) यावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच पर्यावरण ( Aditya Thackeray on environment ) हा मुख्य प्रश्न म्हणून राजकारण्यांनी त्याचा विचार करावा, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray news Mumbai ) यांनी केले आहे. तसेच, भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या ( Aaditya Thackeray on supreme court over loudspeaker ) आदेशांचे पालन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राजकारण्यांनी विचार करावा -हवामानातील बदल आणि भौगोलिक ( Aaditya Thackeray on Loudspeaker news Mumbai ) व इतर कारणांनी जगभरातील शहरांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. मुंबई महानगराला देखील पावसाळ्यात अतिवृष्टीप्रसंगी पूरस्थितीचा सामना करावा लागतो. या अनुषंगाने मुंबईतील पूर जोखीम, वेगवेगळ्या घटकांवर त्याचे होणारे परिणाम व संभाव्य उपाययोजना या विषयी विचारविनिमय आणि मार्गदर्शन करण्यासाठी (आज २८ एप्रिल आणि उद्या २९ एप्रिल) दोन दिवसीय कार्यशाळेचे ( Aaditya Thackeray at Sahyadri State Guest House Mumbai ) आयोजन सह्याद्री राज्य अतिथीगृह (वाळकेश्वर) येथे करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.