महाराष्ट्र

maharashtra

Aditya thackeray on CM shinde : त्यांनी निर्लज्ज राजकारण केले, जनता उत्तर देईल.. आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसह बंडखोरांवर घणाघात

By

Published : Aug 3, 2022, 9:10 AM IST

Updated : Aug 3, 2022, 9:15 AM IST

आदित्य ठाकरेंनी पुणे दौरऱ्यात बंडखोर आमदारांना ( Aditya thackeray on eknath shinde ) चांगलेच धारेवर धरले. आमदारांनी खोटेपणाचा कळस गाठला, त्यांनी जे केले ते निर्लज्ज राजकारण आहे, असा घणाघात ( Aditya thackeray slams rebel mla in pune rally ) आदित्य ठाकरेंनी केला. पुण्यातील कात्रज चौकामध्ये काल आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा आली होती.

aditya thackeray on eknath shinde
बंडखोर आमदार टीका आदित्य ठाकरे पुणे रॅली

पुणे - आदित्य ठाकरेंनी पुणे दौरऱ्यात बंडखोर आमदारांना ( Aditya thackeray on eknath shinde ) चांगलेच धारेवर धरले. आमदारांनी खोटेपणाचा कळस गाठला, त्यांनी जे केले ते निर्लज्ज राजकारण आहे, असा घणाघात ( Aditya thackeray slams rebel mla in pune rally ) आदित्य ठाकरेंनी केला.पुण्यातील कात्रज चौकामध्ये काल आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा आली होती. त्यावेळी शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे

हेही वाचा -Eknath Shinde on Uday samant : गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिल्ली वाले आता किंमत देत नाही, म्हणून.. -दिल्ली वाले आता किंमत देत नाहीत विचारत नाहीत म्हणून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे गद्दार हे महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी आमचा घात केला. शिवसेना अशी संपत नाही, कारण शिवसेना म्हणजे हे महाराष्ट्राचे कुटुंब आहे आणि महाराष्ट्राची जनता हीच आमची शिवसेना आहे, त्यामुळे या गद्दारांना तुम्ही निवडून देणार का असे विचारत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

कुण्या तोंडाने राजकारणात या, असे सांगू -महाराष्ट्राच्या राजकारणातील आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी घाणेरडी राजकीय वृत्ती समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पक्षांतर झाले, परंतु जे झाले त्यामध्ये त्यांनी आमदारकीचा खासदारकीचा राजीनामा दिला, दुसऱ्या पक्षात जाऊन ते लढले आणि निवडून आले किंवा पराभूत झाले अशी माहिती देत झालेले घाणेरड्या राजकारण किळसवाणे असून महाराष्ट्रातल्या युवांना मी कुण्या तोंडाने राजकारणात या, असे सांगू आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

शिवसेना आणि ठाकरे कुटुंब संपवण्याचा प्रयत्न -बंड करायला हिम्मत लागते, तुम्ही गद्दार आहात, त्यामुळे तुम्हाला बंडखोरी करता येत नाही. बंड करायचे तर इथेच केला असता. पूर आलेल्या ठिकाणी तुम्ही मस्त मजा केली. गोव्यामध्ये नाच केला. निर्लज्जपणाचा कळस आहे. राजकारणाची पातळी खालावली आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि ठाकरे कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, महाराष्ट्रातला नागरिक ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. आमचे कुटुंब हे महाराष्ट्रातली जनता आहे, ती संपवू शकणार नाही. आता मी यांना जास्त बोलणार नाही. यांना जनताच उत्तर देईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

जनतेला भावनिक साद - शिवसेनेने काय केले नाही? मंत्री पद दिले. शिवसेनेने फंड दिला, शिवसेनेने ओळख दिली. पाठीत खंजीर खुपसायचाच होता तर समोरून वार करायचा पाठीमागून काय करता, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच, मला तुम्ही सांभाळणार का नाही? असा प्रश्न करत आदित्य ठाकरे यांनी जनतेला भावनिक साद घातली. पुण्यातील कात्रज चौकामध्ये आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा -घाबरणाऱ्यातला मी नाही, सहनशीलतेचा अंत पाहू नका.. उदय सामंत यांचा हल्लेखोरांना इशारा

Last Updated : Aug 3, 2022, 9:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details