मुंबई श्रावण महिन्यातील Shravan month प्रत्येक वाराचे महत्त्व अगदी निरनिराळे आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू होतो. चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिना Shravan month हा उपवासांचा व्रतांचा उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक वाराचे वेगळे महत्त्व आहे. वारानुसार त्या त्या देवतांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. श्रावणी सोमवार shravan somvar मंगळागौर बुध बृहस्पति पूजन जिवतीची पूजा किंवा जरा जिवंतिका पूजन अश्वत्थ मारुती पूजन याप्रमाणे श्रावणातील रविवारी सूर्याचे पूजन surya puja केले जाते. यावेळी आचरल्या जाणाऱ्या व्रताला आदित्य राणूबाई व्रत असे संबोधले जाते. हे व्रत कसे करावे व्रताची कहाणी काय? जाणून घ्या.
आदित्य राणूबाई व्रतश्रावणातील रविवारी हे व्रत स्त्रियांनी करावयाचे आहे. स्नानानंतर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे. बाजूला एका वर्तुळात षटकोन काढावा. नंतर सहापदरी दोऱ्याला सहा गाठी माराव्यात. सूर्यचित्र, षटकोन आणि सहा गाठी मारलेला सहापदरी दोरा या सर्वांची एकत्रित पूजा करावी. एका सवाष्णीला जेवावयास घालावे. या व्रताच्या दोन कथा आहेत.
श्रावणी रविवार कहाणीराणूबाई ही सूर्याची पत्नी. तिची पूजा या व्रतात केली जाते. तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झाली. तिला या गोष्टीचा खूप पश्चात्ताप झाला. यानंतर तिने आदित्य राणूबाईची पूजा केली. व्रताचा संकल्प करून आदित्य राणूबाईचे मनोभावे पूजन केले. या व्रतानंतर तिला पुन्हा गतवैभव लाभले.