मुंबई -राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने 25826 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती योजनेसाठी, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी, आणीबाणी तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींसाठी आणि अगदी गुजराती भाषेच्या प्रचारासाठी ही पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत.
आणीबाणी तुरुंगवास भोगलेल्यांसाठी 120 कोटीआणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींसाठी मानधन योजना फडणवीस सरकारने सुरू केली होती मात्र महाविकास आघाडीने ही योजना बंद केली होती ती पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारने कार्यान्वित केली आहे या योजनेसाठी दोन वर्षांची थकबाकी देण्यासाठी 119 कोटी 45 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेसाठी 5000 कोटीपीक कर्जाची ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा परतावा प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस म्हणून रक्कम देण्यात येत होती ही रक्कम देण्याची योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केली.ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली असून त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानासाठी 500 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.