महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कामांची नियमितपणे पाहणी करा - अश्विनी भिडे - अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे

आपापल्या क्षेत्रात असलेल्या विविध यंत्रणांशी समन्वय साधावा, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी आज (मंगळवारी) सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहे. पावसाळापूर्व समन्वय बैठकीदरम्यान महानगरपालिकेच्या व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना अश्विनी भिडे बोलत होत्या.

आढावा बैठक
आढावा बैठक

By

Published : Apr 19, 2022, 8:57 PM IST

मुंबई -येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध कामे सुरू आहेत. या सर्व कामांची नियमितपणे पाहणी करावी, तसेच आपापल्या क्षेत्रात असलेल्या विविध यंत्रणांशी समन्वय साधावा, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी आज (मंगळवारी) सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहे. पावसाळापूर्व समन्वय बैठकीदरम्यान महानगरपालिकेच्या व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना अश्विनी भिडे बोलत होत्या.


'कामांची नियमितपणे पाहणी करा' :महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांच्या सहायक आयुक्तांनी येत्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आपापल्या क्षेत्रात सुरु असलेल्या कामांची नियमितपणे पाहणी करण्याचे आदेश दिले. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने व्हावा, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे पाऊस सुरू असताना वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सुरळीतपणे व अव्याहतपणे सुरू राहावी याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळच्या वेळी करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. पावसाळ्या दरम्यान झाड पडल्यास तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी उद्यान खात्याला दिले. तर दरड कोसळण्याचा धोका असलेल्या भागांमध्ये संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. धोकादायक इमारतींबाबत 'सुनिश्चित कार्यपद्धती'नुसार निर्धारित कार्यवाही पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावी, असेही आदेश त्यांनी दिले.

हेही वाचा -Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीचा वापर दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यासाठी होऊ शकतो -सितारामन

ABOUT THE AUTHOR

...view details