मुंबई -पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा गजाआड आहे. 27 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान मुंबई पोलीस राज कुंद्राच्या विरोधात पुरावे गोळा करत आहे. या तपासात पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे देखील लागले आहेत. तसेच काही बँकेची खाती देखील मुंबई पोलीस खंगाळत आहे. यामध्ये पोलिसांना शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या जॉईंट अकाऊंटबद्दल माहिती देखील मिळाली आहे.
Raj Kundra case: अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुंबई पोलिसांच्या रडारवर? - Actress Shilpa Shetty
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा गजाआड आहे. 27 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान मुंबई पोलीस राज कुंद्राच्या विरोधात पुरावे गोळा करत आहे. या तपासात पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे देखील लागले आहेत. तसेच काही बँकेची खाती देखील मुंबई पोलीस खंगाळत आहे. यामध्ये पोलिसांना शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या जॉईंट अकाऊंटबद्दल माहिती देखील मिळाली आहे.
पीएनबी बँकेच्या खात्याची होणार चौकशी
पंजाब नॅशनल बँकेमध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या दोघांचे जॉईंट आकाऊंड आहे. या खात्यातून मागच्या एका वर्षाच्या काळात कोट्यवधींचे ट्रांजेक्शन झाले आहे. क्राईम ब्रांचला संशय आहे की, हॉटशूट आणि बॉलीफेम अॅपमधून मिळणारी कमाई या खात्यात जमा केली जात असे. दरम्यान, तपासात असे समोर आल आहे की या खात्यात डायरेक्ट ट्रांजेक्शन होत नव्हते. तर थोड्या थोड्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर केले जात. 23 जुलै रोजी जेव्हा पोलीस शिल्पा शेट्टी हिच्या घरी गेले होते, तेव्हा पोलिसांनी या संदर्भात शिल्पा शेट्टी हिला या खात्याबाबत विचारणा देखील केली असल्याचं कळतंय.
हेही वाचा -Raj Kundra Case: पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या विरोधात ED घेऊ शकते अॅक्शन- सूत्र