अभिनेत्री सायरा बानो रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू - अभिनेते दिलीप कुमार
अभिनेत्री सायरा बानो यांची अचानक तब्बेत बिघडली असून त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहे. ब्लड प्रेशर आणि डायबेटिज् वाढल्याचे कारण सांगण्यात येत आहे. सायरा बानो या अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी आहेत. नुकतेच दिलीप कुमार यांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई -अभिनेत्री सायरा बानो यांची अचानक तब्बेत बिघडली असून त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहे. ब्लड प्रेशर आणि डायबेटिज् वाढल्याचे कारण सांगण्यात येत आहे. सायरा बानो या अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी आहेत. दिलीप कुमार यांचे नुकतेच निधन झाले आहे.
अभिनेत्री सायरा बानू यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अतिदक्षता विभागात (Intensive Care Unit) ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर्स लक्ष ठेऊन आहेत. खरंतर तीन दिवसांपूर्वी त्यांना येथे आणण्यात आले होते. त्यांच्या खासगी जीवनात हल्लीच घडलेल्या वाईट घडामोडींमुळे त्यांना अत्यवस्थ वाटत होते. रक्तदाब वाढल्याने आणि रक्तातील साखर वाढल्याने सायरा बानो यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असली तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच, ७ जुलै ला, ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते आणि सायरा बानू यांचे पती युसूफ खान उर्फ दिलीप कुमार यांचे निधन झाले होते. कित्येक वर्षांपासून दिलीप कुमार यांची प्रकृती खराब होती आणि सायरा बानू यांनी त्यांची इमाने इतबारे काळजी घेत देखभाल केली होती. त्यांच्या पतिप्रेमाबद्दल आणि कलियुगातही त्यांच्या निस्वार्थी सेवेबद्दल सायरा बानू यांची सर्व स्तरावरून वाहवा झाली होती. ‘मी कोणालाही खूष करण्यासाठी हे करत नाहीये. दिलीप कुमार माझे सर्वस्व आहेत आणि मी माझे कर्तव्य करीत आहे. यासाठी कृपया कुठलाही गाजावाजा करू नका’, अशा प्रकारचे निवेदनवजा आवाहन सायरा बानू यांनी त्यावेळी केले होते.
सायरा बानू या ७७ वर्षांच्या आहेत आणि ५४ वर्षांच्या दिलीप कुमार यांच्या साथीनंतर त्यांच्यात एकाकीपणाची भावना निर्माण झाली असावी. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर आयुष्यात निर्माण झालेल्या पोकळीमुळे त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झालीय. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना चित्रपटसृष्टीतून केली जातेय.
सायरा बानू यांच्या हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीतील अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.