मुंबई -सहा दिवसांनंतर अभिनेत्री कंगना रणौत तिच्या घरी म्हणजेच हिमाचल प्रदेशला परतणार आहे. यासाठी ती मुंबई विमानतळावर दाखल झाली आहे. नातेवाईकांचे लग्न असल्याने कंगना हिमाचल प्रदेशला सकाळीच पाली हिल येथील घरातून विमानतळाच्या दिशेने निघाली. 9 सप्टेंबरला मनालीवरून परतल्यानंतर कंगना तिच्या मुंबईतील घरी वास्तव्यास होती. यावेळी तिला होम क्वारन्टाइन कऱण्याविषयी चर्चा होती. अखेर आज आठवड्यानंतर कंगना रणौत तिच्या घरी परतणार आहे.
सहा दिवसांनंतर अभिनेत्री कंगना रणौत तिच्या घरी म्हणजेच हिमाचल प्रदेशला परतणार आहे. संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने कंगना सध्या चर्चेत आहे. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. कंगना मुंबई विमानतळावर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी विरोध केला होता. तसेच संजय राऊत यांनीही ट्विटरवर सतत खडेबोल सुनावले होते. यातच काल कंगनावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटली. त्यामुळे कंगनाचा 'बोलवीता धनी कोण', या चर्चेला उधाण आले आहे. अखेर आज ती मुंबई विमानतळावरून मनालीला रवाना झाली आहे.
महाराष्ट्र सरकार आणि कांगना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद विवाद पाहायला मिळाला. कंगनाने मुंबईला पाकिस्तान संबोधले होते. यानंतर महा विकास आघाडीतील शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर प्रखर टीका करत मुंबईत कंगनाला येण्यासाठी विरोध केला होता. कंगनाने हे चॅलेंज स्वीकारत 9 सप्टेंबर रोजी मुंबई जवळ केली. कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेने हातोडा देखील फिरवला होता. यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आणि कंगना विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा वाद पाहायला मिळाला. गेले पाच दिवस कंगना मुंबईत राहिली अनेक घडामोडी घडल्या. परंतु आज कंगना आपल्या मायभूमीत हिमाचल प्रदेश या ठिकाणी निघाली आहे आहे.
कंगना रणौत मुंबई विमानतळावर दाखल झाली आहे.
कंगना रणौतने महाराष्ट्र सरकारवर गेल्या काही दिवसात अनेक टीका केल्या आहेत. तसेच कंगनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र सरकारला भाजप नेते प्रत्युत्तर करण्यास सरसावले होते. यानंतर कंगनाला भाजपचा पाठिंबा आहे अशीच सर्वसामान्यांमध्ये देखील चर्चा होती. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणापासून सुरू झालेला हा सर्व वाद बिहारच्या निवडणुकीसाठी चाललेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामध्येच आता बिहारच्या निवडणुका जवळ आल्याने अभिनेत्री कंगना भाजपाचा प्रचार करेल असे संकेत राजकीय विश्लेषकांनी दिले आहेत. त्यामुळे आज कांगना मुंबईतून आपल्या मायभूमीत हिमाचल प्रदेशात रवाना झाली आहे.