मुंबई - क्रूज ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने पुन्हा कारवाई सुरू केली आहे. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हॉट्सअॅप चाटच्या आधारे एनसीबीने आज अभिनेत्री अनन्या पांडेला चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. मात्र, तब्बल दोन तास उशिराने अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्याबरोबर एनसीबी कार्यालयात आली.
हेही वाचा -देशातील 100 कोटी कोरोना लसीकरणात राज्याचा मोठा वाटा- राजेश टोपे
एनसीबीकडून अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम
गुरुवारी एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरूख खानच्या घरी मन्नत पोहोचले. अहवालानुसार, पथकाने अनन्याच्या घरातून काही वस्तू देखील घेतल्या आहेत. त्याचबरोबर, अनन्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनच्या जामिनासाठी २६ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. यानंतर एनसीबी पथक अॅक्शन मोडमध्ये आले आहे. एनसीबीने आर्यन खानसोबत काही नवीन अभिनेत्रींशी गप्पा मारल्याच्या बातम्या आल्या होत्या.
एनसीबीच्या तपासाची व्याप्ती वाढत आहे
बॉलिवूड ड्रग प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तपासाची व्याप्ती वाढत आहे. एनसीबीचे एक पथक गुरुवारी सकाळी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी चौकशीसाठी पोहोचले आणि चार ते पाच तासांच्या चौकशीनंतर निघून गेले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अभिनेता अनन्या पांडेचा फोन घेतला आहे. तिला मुंबई ड्रग्ज प्रकरणाच्या संदर्भात चौकशी एजन्सीने चौकशीसाठी बोलावले आहे.