मुंबई- बॉलिवूड कलाकार विक्रांत मेसी याचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. याबाबत त्याने मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीह बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते.
थेट संदेश पाठवून खाते हॅक-
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार या दोन्ही कलाकांरचे अकाउंट संदेश बॉक्सच्या माध्यमातून हॅक करण्यात आले होते. या दोघांनाही हॅकरने एक लिंक असलेला संदेश पाठवला होता. हॅकर कडून यांना ती लिंक उघडायला सांगून त्यात गोपनीय माहिती (पासवर्ड, युसर आईडी) भरायला सांगितली होती. त्याच अधार हॅकरने या दोघांच्याही सोशल अकाउंटवर ताबा मिळाला मिळवला.