महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अभिनेते सोनू सूद यांनी घेतली राज्यपालांची भेट; राज्यपालांनी दिले 'हे' आश्वासन - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्र

प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी सोनू सूद यांनी केलेल्या कामाची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली.

sood
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेताना सोनू सूद

By

Published : May 30, 2020, 7:52 PM IST

मुंबई- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आज प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेताना सोनू सूद

सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेते सूद हे सध्या परप्रांतीय मजुरांसाठी देवदूत ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मध्यंतरी त्यांना फोन करून विचारपूस केली होती. आज राज्यपालांनी सूद यांचे कौतुक करून त्यांना त्यांच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details