महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ranveer Singh Nude Photoshoot : अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ? इतक्या वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग ( Bollywood actor Ranveer Singh ) सध्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच ( Nude photoshoot case ) चर्चेत आला आहे. त्याने हे न्यूड फोटोशूट पेपर मॅगझिनसाठी केले आहे. या फोटोंमध्ये रणवीर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देत आहे. या फोटोशूटच्या काही फोटोंमध्ये तो कपड्यांशिवाय खाली झोपलेला दिसतो तर, काहींमध्ये तो उभा आहे. त्या विरोधात सामाजिक संघटनेने तक्रार दाखल केली आहे. तर पाहुयात त्याला काय होऊ शकते शिक्षा..

By

Published : Jul 29, 2022, 6:58 PM IST

Updated : Jul 29, 2022, 8:22 PM IST

Ranveer Singh
रणवीर सिंग

मुंबई - रणवीर सिंगच्या ( Bollywood actor Ranveer Singh ) फोटोशूटमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या न्यूड फोटोशूटच्या निमित्ताने रणवीर सिंगला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात ( Nude photoshoot case ) आहे. एवढेच नाही तर, त्याच्यावर चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल ( case registered against Ranveer Singh ) करण्यात आला आहे. तर काही बॉलीवूड कलाकार रणवीर सिंगच्या बाजूने त्याला समर्थनात ( Bollywood support for Ranveer Singh ) देत आहे. एकूणच या फोटोंमुळे रणवीर सिंग चर्चेत आहे. रणवीर सिंग यापूर्वी देखील अनेक कलाकारांनी अशा प्रकारे न्यूड फोटो काढलेले आहे मात्र, त्यापैकी अनेक कलाकारांचे नाव चर्चेत आले नव्हते मात्र, मिलिंद सोमण ( Milind Soman ) या कलाकाराने दोन वेळा अशा प्रकारे न्यूड फोटोमुळे वादाच्या भवऱ्यात सापडले होते. या कलाकारावर देखील अशाप्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाप्रकारे गुन्हा दाखल झाल्यानंतर जर, तो सिद्ध झाला तर त्यामध्ये आरोपीला किती शिक्षा होऊ शकते याकरिता कायदा काय सांगतो या संदर्भातील आढावा..

रणवीर सिंगवर खटला? -न्यूड फोटोशूट करून रणवीर सिंग चांगलाच अडकतो आहे. मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात रणवीर सिंगवर अनेक कलमांखाली गुन्हा ( Crime against Ranveer Singh ) दाखल करण्यात आला आहे. एका गैर-सरकारी संस्थेच्या ललित टेकचंदानी ( Lalit Tekchandani ) यांच्या वतीने रणवीरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शाम मंगाराम फाऊंडेशन ( Sham Mangaram Foundation ) नावाच्या या स्वयंसेवी संस्थेने आपल्या तक्रारीत लिहिले आहे की, आम्ही गेल्या 6 वर्षांपासून मुले, विधवांच्या चांगल्या भविष्यासाठी काम करत आहोत. रणवीर सिंगचे फोटो ज्या पद्धतीने काढले आहेत ते पाहून कोणत्याही स्त्री पुरुषाला लाज वाटेल. रणवीरविरुद्ध आयपीसीच्या कलम 292, 293, 509 आयटी कायद्याच्या कलम 67 (ए) अंतर्गत महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉलीवूड अभिनेत्याविरुद्ध ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या कलमांतर्गत त्याला किमान 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

हेही वाचा -लग्नाच्या ६ वर्षांनंतर बिपाशा बसू लवकरच देणार 'गुड न्यूज'!!

वेगवेगळ्या कलमांना शिक्षा? -IPC चे कलम 292 अश्लीलता प्रौढ सामग्रीशी संबंधित आहे. या कलमांतर्गत प्रथमच दोषी आढळल्यास त्याला दोन वर्षांपर्यंत कारावास, 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. तर, दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 5 वर्षांचा कारावास तसेच 5 हजारांचा दंड होऊ शकतो. 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला कोणीही असे अश्लील साहित्य विकले किंवा दाखवले तर, त्याच्याविरुद्ध कलम 293 नुसार गुन्हा दाखल केला जातो. पहिल्यांदा दोषी आढळल्यास 3 वर्षे शिक्षा आणि 2 हजारांपर्यंत दंड आणि दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 7 वर्षे कारावास आणि 5 हजार दंड होऊ शकतो. कलम 509 स्त्रीच्या प्रतिष्ठेच्या अपमानाशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने स्त्रीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचे कृत्य केले आणि तो दोषी आढळला तर त्याला 3 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

आयटीच्या कलम 67 (ए) नुसार गुन्हा -त्याचप्रमाणे आयटीच्या कलम 67 (ए) नुसार एखाद्या व्यक्तीने इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे अशी कोणतीही सामग्री प्रकाशित केल्यावर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. यामध्ये पहिल्यांदा दोषी आढळल्यास 5 वर्षे कारावास आणि 10 लाखांचा दंड आणि दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 7 वर्षांचा कारावास आणि 10 लाखांचा दंड होऊ शकतो. गोपनीयतेचा अधिकार हा घटनेच्या कलम 21 अन्वये जगण्याच्या अधिकाराचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा मूलभूत भाग आहे. हे संविधानाच्या भाग-3 अंतर्गत दिलेल्या स्वातंत्र्याचाच एक भाग आहे. घटनेच्या कलम 21 नुसार कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जगण्याच्या आणि स्वातंत्र्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. कलम 21 अन्वये प्रत्येकाला सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार आहे. समाजात चुकीच्या नजरेने पाहिल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायावर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, प्रौढ महिलेला तिचा व्यवसाय निवडण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा आदर केला पाहिजे. पण घटनेने दिलेल्या या अधिकाराच्या आधारे सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करण्याचा अधिकार कोणाला मिळतो का?

मिलिंद सोमण, न्यूड फोटोशूट प्रकरण? - 1995 मध्ये मिलिंद सोमण आणि त्यांची तत्कालीन मैत्रीण मधु सप्रे यांना एका फुटवेअर कंपनीने त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवले होते. या कंपनीच्या शूजच्या जाहिरातीसाठी मिलिंद सोमण आणि मधु सप्रे यांनी न्यूड फोटोशूट केले होते. दोघांच्या गळ्यात अजगर होते. त्याचवेळी दोघांनी फक्त बूट घातले होते. हा फोटो फोटोग्राफर प्रबुद्ध दासगुप्ता यांनी क्लिक केला आहे. फोटो छापताच देशभरात खळबळ उडाली. त्याविरोधात शिवसेनेसह अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरून निदर्शनेही केली. वाद वाढल्यानंतर या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली होती. हा खटला 14 वर्षे न्यायालयात चालला. 2009 मध्ये या प्रकरणात मिलिंदची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मिलिंद सोमण 2020 मध्येही वादात सापडला होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने समुद्रकिनाऱ्यावर नग्न अवस्थेत धावतानाचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोच्या माध्यमातून मिलिंदने स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचवेळी फोटोचे क्रेडिट त्यांची पत्नी अंकिता कोंवर यांना देण्यात आले. यानंतर त्याच्यावर भादंविच्या कलम 294 आणि कलम 67 अंतर्गत अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.

या अभिनेत्यांचे देखील न्यूड फोटोशूट - रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटचा वाद वाढत चालला आहे. असे करणारा रणवीर सिंग हा पहिला अभिनेता नाही. ज्याने न्यूड फोटोशूट केले आहे. याआधीही अनेक स्टार्सनी न्यूड फोटोशूट केले आहे. राहुल खन्ना, मिलिंद सोमण, जॉन अब्राहम, दक्षिणेतील अभिनेता विजय देवरकोंडा यांसारखे अभिनेते त्यांच्या न्यूड फोटोशूटने चर्चेत आले आहेत. रणवीर सिंग, मिलिंद सोमण या कलाकारांना सोडले तर, हे सर्व कलाकार फोटोशूटचे प्रकरण कायदेशीर टप्प्यापर्यंत पोहोचले नाही. ही वेगळी बाब असली तरी, अशा परिस्थितीत रणवीरच्या फोटोशूटवरून एवढा वाद कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कायदा काय सांगतो? - अभिनेता रणवीर सिंग यांनी केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे वादामध्ये अडकला असला तरी, मात्र कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. कायद्यामध्ये असे, म्हटले आहे की एखादा व्यक्ती अंग प्रदर्शन करत असेल तर, तो कोणत्या हेतूने करतो हे महत्त्वाचे असते. अभिनेता रणवीर सिंगने जो न्यूड फोटो काढला आहे तो कोणत्या उद्दिष्टाने काढला आहे. त्यानंतरच त्याच्यावर न्यायालयात कुठलीही कारवाई होऊ शकते अशा प्रकारे अनेक तक्रार तक्रारी यापूर्वी देखील झालेले आहे. मात्र, त्यामध्ये तथ्य आढळून आलेले नाही असे, मत कायदे तज्ञ असीम सरोदे ( Asim Sarode ) यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -रुसो ब्रदर्सनी नवीन कॅप्टन मार्वलसाठी केली प्रियांका चोप्राची निवड

Last Updated : Jul 29, 2022, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details