मुंबई -अभिनेता रणवीर सिंगच्या ( Actor Ranveer Singh ) अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. न्यूड फोटो शूट ( Nude Photoshoot ) प्रकरणात चेंबूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात रणवीर सिंगला चेंबूर पोलिसांकडून लवकरच समन्स पाठवण्यात येणार ( Chembur police will send Summons ) असून चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे निर्देश देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात रणवीर सिंगच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मॅक्झिनच्या प्रमोशनसाठी न्यूड फोटोशूट -एका मॅक्झिनच्या प्रमोशनसाठी ( Maxine promotion ) रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केले होते. त्यानंतर हे फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर त्याच्या विरोधात अनेक ठिकाणाहून टीका तर अनेक ठिकाणाहून त्याला समर्थन दर्शविण्यात येत होते. त्या विरोधात भाजपच्या एका नेत्याकडून चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये ( Chembur Police Station ) तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत पुढील चौकशी सुरू केली आहे.