मुंबई : सोनी मराठी वाहिनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. 'जिवाची होतिया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) मालिकेत नवरात्रीनिमित्त विशेष यक्षगणचे चित्रीकरण सुरु असून त्यात राजची विशेष भूमिका पाहणे साऱ्या रसिक प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे. विशेष म्हणजे राज या विशेष भागादरम्यान रावणाच्या भूमिकेत (Actor Raj Hanchanale will play role of Ravana) पाहायला मिळणार आहे.
मालिकांमध्ये मुख्य नायक त्याच्या रोजच्या भूमिकेहून एक वेगळी भूमिका साकारतोय असे सहसा होत नाही आणि हे जिवाची होतिया काहिली मालिकेदरम्यान पाहायला मिळणार आहे. राज म्हणजे अर्जुन. त्याला रावणाच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना नक्कीच भावेल.