मुंबई -अभिनेता महेश ठाकूर यांनी अंधेरीतील ओशिवारा पोलीस ठाण्यात मयांक गोयल नावाच्या व्यक्तीविरुद्ध Actor Mahesh Thakur cheated फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मयांकने ५ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अभिनेता महेश ठाकूरने केला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420 आणि 406 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.
मुंबईत छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर आपला ठसा उमटवणारे अभिनेते महेश ठाकूर यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. या अभिनेत्याची फसवणूक झाली आहे. त्यामुळे त्याने आंबोली पोलिसात तक्रार दिली आहे. महेश ठाकूर या अभिनेत्याने आंबोली पोलिस ठाण्यात 5.43 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.