मुंबई - अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर ( Mahesh Manjrekar ) यांच्याविरुद्ध IPC कलम 292, 34, POCSO कलम 14 आणि IT कलम 67, 67B अन्वये मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांसह अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल ( Actor Mahesh Manjrekar Against Case Registered ) करण्यात आला आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या माहीम पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत.
चित्रपटात अश्लील दृश्य दाखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल -
महेश मांजरेकर यांचा चित्रपट 'वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा ( Varan Bhat Loncha Kon Nai Koncha ) मराठी चित्रपट वादात सापडला आहे. गिरणी कामगारांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांमध्ये बोल्ड दृश्यामुळे यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. या चित्रपटांमध्ये महिला आणि लहान मुलांचे आक्षेपार्ह चित्रण दाखवण्यात आल्यामुळे याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील पॉस्को न्यायालयात ( POSCO Special Court ) गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने महेश मांजरेकर यांच्याविरोधात चित्रपटातील दृष्यासंदर्भात तपास करण्याचे आदेश माहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले होते. त्यानंतर आज त्यांच्यावर विविध कलमांन्वे गुन्हा दाखल करण्याचे आदेश हे न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा -Order of POSCO Special Court : महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ, अश्लील चित्रणाबद्दल तपासाचे पोलिसांना आदेश