मुंबई -पोलिसांनी अभिनेता कमाल खानला विनयभंग केल्याप्रकरणी अटक Actor Kamal Khan Arrested In Mumbai केली आहे. 2019 मध्ये महिला फिटनेस ट्रेनरचा विनयभंग केल्याप्रकरणी Kamal Khan arrested in molestation case त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. महिलेने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, कमाल खानने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने तिला घरी बोलावून तिचा विनयभंग केला होता. .
4 सप्टेंबर रोजी जुन्या प्रकरणात अटक -अभिनेता कमाल खान याला मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी रविवारी 4 सप्टेंबर रोजी अटक केली आहे. यापूर्वी एका गुन्ह्यात तो अटकेत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्यांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी एका प्रकरणात अटक आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, जून २०२१ मध्ये कमाल खानविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (अ), आयपीसी ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. खान यांनी जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात महिलेचा विनयभंग केला होता