ED Stopped Jacqueline Fernandez - जॅकलिन फर्नांडीसला ईडीने मुंबई विमानतळावरच थांबवले - अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस
दोनशे कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर (Accused Sukesh Chandrashekhar) सोबतच्या संबंधामुळे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या चांगलीच अडचणीत सापडली आहे. काही कामानिमित्त देशाबाहेर निघालेल्या जॅकलिनला रविवारी (ता. ५ डिसेंबर) सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुंबई विमानतळावरच (Mumbai Airport) थांबवले आहे.
मुंबई -दोनशे कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर (Accused Sukesh Chandrashekhar) सोबतच्या संबंधामुळे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या चांगलीच अडचणीत सापडली आहे. काही कामानिमित्त देशाबाहेर निघालेल्या जॅकलिनला रविवारी (ता. ५ डिसेंबर) सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुंबई विमानतळावरच (Mumbai Airport) थांबवले आहे.
तब्बल दोनशे कोटींच्या खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखर (Accused Sukesh Chandrashekhar) हा मुख्य सूत्रधार आहे. त्याचा आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा (Jacqueline Fernandez) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो या वर्षीच्या एप्रिल-जून महिन्यातील असल्याचे सांगितले जाते. त्यावेळी सुकेश हा जामिनावर बाहेर होता. जॅकलिनला तो चेन्नईमध्ये चार वेळा (Jacqueline Meets Sukesh) भेटला होता, या भेटीसाठी त्याने प्रायव्हेट जेटची व्यवस्था केल्याचे सांगितले जाते.
9 लाखाची पार्शियन कॅट दिली भेट
जॅकलिन फर्नांडिस हिला सुकेश चंद्रशेखर यांनी भेट म्हणून 52 लाखांचा घोडा आणि 9 लाख रुपयांची पर्शियन मांजर भेट दिल्याचे समोर आले आहे. तसेच, त्याने जॅकलिन अनेकवेळा महागडे दागिनेही भेट दिले होते. सुकेश याच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ही माहिती उघड झाली आहे. या आरोपपत्रात जॅकलिनसोबत आणखी एक अभिनेत्री नोरा फतेही हिचेही नाव आहे.
दिल्ली कार्यालयात चौकशीला गेली समोर
याच प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस ही ईडीसमोर 20 ऑक्टोबरला हजर झाली होती. चौकशीला सलग चारवेळी दांडी मारल्यानंतर ती ईडीच्या दिल्ली कार्यालयात जॅकलीन चौकशीला सामोरे गेली होती. जॅकलिनचा जबाब कर चुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यातंर्गत नोंदवण्यात आला होता. तिचे आर्थिक व्यवहार आणि सुकेश चंद्रशेखरसोबत तिची ओळख यामुळे ती ईडीच्या रडारवर आहे. सुकेश चंद्रशेखरचा जॅकलिनचा काही आर्थिक व्यवहार झाला होता का? या अंगाने ईडी तपास करत आहे.
हेही वाचा -Girish Kuber Ink Thrown Incident : गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकल्याची घटना दुर्दैवी - बाळासाहेब थोरात