महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अभिनेत्री गेहना वशिष्ठला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी - अश्लील व्हिडिओ चित्रिकरण

गेहना वशिष्ठ हिला पोलिसांनी रविवारी कोर्टात हजर केले. त्यानंतर कोर्टाने तिला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.

गहना वशिष्ठला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
गहना वशिष्ठला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

By

Published : Feb 8, 2021, 12:02 AM IST

Updated : Feb 8, 2021, 3:36 AM IST

मुंबई- टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल गेहना वशिष्ठला मुंबई क्राइम ब्रँचचने शनिवार रात्री अटक केली होती. त्यानंतर आज तिला न्यायालयात हजार करण्यात आले. टीव्ही चित्रपट या क्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छीणाऱ्या आणि यामध्ये करीअर करण्यासाठी धडपड करणाऱ्यांना काम देण्याचे आमिष दाखवून त्यांना अश्लील व्हिडिओ निर्मितीसाठी काम करण्यास ती भाग पडात होती. त्यानंतर ते व्हिडिओ विविध वेबसाईटवर प्रदर्शित करत लाखो रुपये कमवत असल्याचा तिच्यावर आरोप आहे.

गेहनाचा स्वत:चा स्टुडिओ-

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गहना वशिष्ठ हिचे एक जीवी स्टूडिओ नावाने प्रोडक्शन हाऊस आहे. ज्या माध्यमातून ती हे व्हिडिओ चित्रित करत होती. ती २०२९ पासून अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत आहे. पोलिसांना आतापर्यंत जवळपास 90 अश्लील व्हिडिओ मिळाले आहेत. हे सर्व व्हिडिओ गहना वशिष्ठच्या स्टुडिओमध्ये चित्रित झाले आहेत.

क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 3 फेब्रुवारीला गेहना वशिष्ठच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी तिच्या घरातून तीन मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि काही बँकीची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी रात्री तिला अटक करण्यात आली होती. आज पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने तिला 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गेहना वशिष्ठला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना गहना जवळ दोन वेबसाईट असल्याची माहिती मिळाली. ज्यावर ती हे चित्रित केलेले अश्लील व्हिडिओ अपलोड करत होती. हे व्हिडिओ पाहण्यासाठी वापरकर्त्याला तिचे चॅनल सब्सक्राइब करावे लागत होते.

Last Updated : Feb 8, 2021, 3:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details