मुंबई-अमली पदार्थ तस्कर फारुख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली होती. त्याने चौकशीमध्ये अभिनेता एजाज खान याचे नाव घेतल्याने, एजाज खानला मंगळवारी एनसीबीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर बुधवारी एजाज खान याला न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडीत करण्यात आली आहे.
दरम्यान मंगळवारी राजस्थानवरून मुंबई विमानतळावर आलेल्या एजाज खानला एनसीबी अधिकार्यांनी तब्यात घेऊन, अंधेरी व लोखंडवाला परिसरात जाऊन काही ठिकाणी छापेमारी केली होती. या दरम्यान एजाज खानच्या घरामधून फक्त चार झोपेच्या गोळ्या मिळाल्याचा दावा स्वतः एजाज खान याने केला आहे. एजाज खानच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीचा गर्भपात झाला होता. यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या पत्नीला उपचारासाठी या झोपेच्या गोळ्या देण्यात येत होत्या, असा दावा एजाज खान याने केला आहे.