महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अभिनेता एजाज खानला अटक, ड्रग तस्कर शदाब बटाटाशी मैत्री पडली महागात - मुंबई न्यूज अपडेट

अभिनेता एजाज खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अमली पदार्थांच्या संदर्भात अटक करण्यात आली आहे. बिग बॉस सीजन 7 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्रीने प्रवेश घेऊन, एजाज खान हा प्रकाशझोतात आला होता. मात्र त्यानंतर तो सतत विवादात राहिला आहे.

अभिनेता एजाज खानला 'एनसीबी'कडून मुंबईत अटक
अभिनेता एजाज खानला 'एनसीबी'कडून मुंबईत अटक

By

Published : Mar 30, 2021, 6:57 PM IST

Updated : Mar 30, 2021, 8:07 PM IST

मुंबई -बॉलीवूड अभिनेता एजाज खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अमली पदार्थांच्या संदर्भात अटक करण्यात आली आहे. बिग बॉस सीजन 7 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्रीने प्रवेश घेऊन, एजाज खान हा प्रकाशझोतात आला होता. मात्र त्यानंतर तो सतत विवादात राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी एजाज खान याला नवी मुंबईतील बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाच्या टीमकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला आता 'एनसीबी'कडून अटक करण्यात आली आहे.

अभिनेता एजाज खान याने रक्त चरित्र, भोंदू, अल्लाह के बंदे, रक्त चरित्र 2, सलाम इंडिया या सारख्या हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. एजाज खान हा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून सतत विवादात राहिला आहे. त्याला सोमवारी एनसीबीकडून अटक करण्यात आली.

एजाज खानला घेऊन पोलिसांची मुंबईत छापेमारी

2 दिवसांपूर्वीच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून शदाब बटाटा या अमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली होती. एनसीबीकडून त्याची चौकशी सुरू असताना त्याने अभिनेता एजाज खानचं नाव घेतल्याने, एजाज खानला अटक करण्यात आली आहे. एजाज खान हा राजस्थानवरून मुंबई विमानतळावर आला असता एअरपोर्टवर त्याला ताब्यात घेऊन, नंतर अटक करण्यात आली. शादाब बटाट्याच्या टोळीचा एजाज सदस्य असल्याचेही सांगितले जात आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एजाज खानला घेऊन, अंधेरी लोखंडवाला परिसरातील काही ठिकाणी छापेमारी केली आहे.

हेही वाचा -मनसुख हिरेन प्रकरणात आणाखी एकाला एटीएसने घेतले ताब्यात

Last Updated : Mar 30, 2021, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details