मुंबई - ड्रग्स प्रकरणी बॉलीवुडमधील अनेक नामवंत कलाकारांचे नाव समोर येत आहेत. शनिवारी अभिनेता अरमान कोहलीच्या घरी एनसीबीने छापेमारी केली. त्यानंतर आता एनसीबीने त्यांना ताब्यात घेतलं आहे.
प्राप्त माहितीनुसार, अरमान कोहलीच्या घरून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर एनसीबीने त्याला कार्यालय घेऊन गेली. एनसीबीचे मुंबई निर्देशक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी दरम्यान अरमान कोहलीने स्पष्ट उत्तर दिली नाहीत. त्यामुळे त्यांना कार्यालयात आणण्यात आलं.