मुंबईमराठा आरक्षणासाठी लढा देणारे शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायक मेटे Vinayak Mete यांच्या गाडीला रवीवारी अपघात झाला. यातच त्यांचे निधन झाले सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातानंतर अनेक प्रश्न सुरवातीपासून अपस्थित केले जात आहेत. यातच मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे Jyoti Mete यांनीही अपघाताचा घटनाक्रम आणि त्या दोन तासात नेमके काय घडले या संदर्भात काही आक्षेप नोंदवत चौकशीची मागणी केली होती यातच आज मेटे यांच्या एका कार्यकर्त्याची ऑडिओ क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे यातही धक्कादायक खुलासे एैकायला मिळत आहेत ईटीव्ही भारत या क्लीपची पुष्टी करत नाही पण यात सांगीतलेला घटनाक्रम धक्कादायक आहे.
3 ऑगस्टलाही झाला प्रयत्न विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. हा अपघात घडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यानंतर खुद्द विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झाले याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली होती अशातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे या क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. या क्लिपमधून तीन ऑगस्टला सुद्धा मेटे यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा दावा केला जात आहे.
अपघातामागचे गूढ वाढलेविनायक मेटेंचा अपघात झाल्यानंतर तिथे बराच काळ मदत पोहोचली नाही असा देखील दावा केला जात आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वेगवेगळे पथक या घटनेचा सखोल तपास करत आहेत. मेटे यांच्या एका कार्यकर्त्याने धक्कादायक खुलासा केल्यामुळे अपघातामागचे गूढ अधिकच वाढले आहे.