महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Weather update : राज्यात मान्सूनचा वेग १८ जूनपासून वाढण्याचा अंदाज, मुंबईत पाऊस सुरू

पेरणीची प्रतिक्षा असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा ( Maharashtra Monsoon Update ) मिळाला आहे. 16 जूनला नैऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गुजरात, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, द.मध्य प्रदेशचा काही भाग, विदर्भाचा बहुतांश भाग,संपूर्ण तेलंगणा, द.छत्तीसगडचा काही भाग, द.ओडिशा, कोस्टल आंध्र प्रदेश, पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराचे आणखी काही ( Monsoon news today Maharashtra ) भागात सरकला आहे. नैऋत्य मान्सून येत्या काही दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या उर्वरित ( Monsoon arrival in India ) भागांमध्ये दाखल होईल.

By

Published : Jun 17, 2022, 7:29 AM IST

Updated : Jun 17, 2022, 11:52 AM IST

मान्सून अपडेट
मान्सून अपडेट

मुंबई- राज्यात मान्सून हळूहळू पुढे सरकत असताना काही जिल्ह्यांत चांगला पाऊस ( Maharashtra Weather update ) झाला आहे. सक्रिय मान्सूनची स्थिती पाहता, १८ जून २०२२ पासून कोकण आणि लगतच्या घाट भागात ( Monsoon Konkan weather today ) पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची अपेक्षा असल्याचे भारतीय हवामान विभागाने ( Maharashtra monsoon live ) म्हटले आहे. या कालावधीत प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

राज्याच्या काही भागात दमदार हजेरी लावली आहे. पेरणीची प्रतिक्षा असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा ( Maharashtra Monsoon Update ) मिळाला आहे. 16 जूनला नैऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गुजरात, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, द.मध्य प्रदेशचा काही भाग, विदर्भाचा बहुतांश भाग,संपूर्ण तेलंगणा, द.छत्तीसगडचा काही भाग, द.ओडिशा, कोस्टल आंध्र प्रदेश, पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराचे आणखी काही ( Monsoon news today Maharashtra ) भागात सरकला आहे. नैऋत्य मान्सून येत्या काही दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या उर्वरित ( Monsoon arrival in India ) भागांमध्ये दाखल होईल. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून छत्तीसगड आणि ओडिशाच्या आणखी काही भागात दाखल होईल.

केरळमध्ये १५ जूनपर्यंत पाच वर्षांतील सर्वात कमी पाऊस-केरळमध्ये गेल्या पाच वर्षांतील पावसाळ्याच्या सुरुवातीला १५ जूनपर्यंत सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. केरळमध्ये १५ जूनपर्यंत केवळ १०९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, २०१८ मध्ये ३४३.७ मिमी, २०१९ मध्ये १७५.४ मिमी, २०१९ मध्ये २३०२ मिमी, आणि २०२ मिमी. 2021 मध्ये 161.1 मि.मी. पाऊस झाला आहे. कोचीन विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ डॉ अभिलाष यांच्या मते, नैऋत्य-पश्चिम दिशेने वाऱ्यांचा अभाव हे मान्सूनच्या पावसात घट होण्याचे मुख्य कारण आहे. "पाऊस पडण्यासाठी दक्षिण-पश्चिम दिशेने ताशी 40 किमीपेक्षा जास्त वेगाने वारे वाहायला हवेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या निर्मितीमुळे वाऱ्यांचा वेग वाढतो परंतु यावेळी कमी दाबाची निर्मिती झालेली नाही.

महाराष्ट्रात मान्सून दाखल, हळूहळू वेग वाढणार-15 जूनपर्यंत मान्सूनच्या पावसात 60 टक्के घट होती. अशीच परिस्थिती राहिल्यास जूनमध्ये कमी पाऊस पडेल ज्याचा शेतीच्या कामावर विपरीत परिणाम होऊ शकतो. वारे मान्सूनचे ढग अरबी समुद्रातून भारताच्या नैऋत्येकडे घेऊन जातात. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. मान्सून जसजसा पुढे जाईल तसतशी परिस्थिती बदलू शकेल आणि सध्याची घट येत्या काही महिन्यांत भरून निघू शकेल, अशी हवामानशास्त्रज्ञांना आशा आहे. आयएमडीने आपल्या हवामान बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, उत्तर अरबी समुद्र, गुजरात राज्य, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, आंध्र प्रदेश आणि पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे.

विदर्भात एक दिवस उशिरा मान्सून दाखल-हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज ( गुरुवारी ) संपूर्ण विदर्भात मॉन्सून दाखल झाला आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यात मोसमी पावसाला ( Seasonal rains in 11 districts of Vidarbha ) सुरुवात झाली असल्याची माहिती नागपूर हवामान विभागाने ( Nagpur Meteorological Department ) दिली आहे. विदर्भात साधारणतः 15 जून र्यंत मान्सून आगमन होते. मात्र, या वेळी केवळ एक दिवस उशिरा मान्सून विदर्भात दाखल झाला आहे. सध्या मान्सूनची स्थिती फार मजबूत नसली तरी येत्या काही दिवसात पाऊस जोर धरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा-IMD issues alert : मान्सूनला अनुकूल वातावरण, 5 दिवसांत महाराष्ट्रात वीजांचा कडकडाट वादळ होण्याची शक्यता

हेही वाचा-Maharashtra weather forecast : 'या' तारखेला विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

हेही वाचा-Vidarbha Rain Update : विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मॉन्सून दाखल; सर्वत्र पावसाचा अंदाज

Last Updated : Jun 17, 2022, 11:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details