महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दाऊद इब्राहिमच्या पुतण्यावर मकोका अंतर्गत कारवाई , 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत वाढ - iqbal kaskar

व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकविल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा पुतण्या व इकबाल कासकर याचा मुलगा रिझवान कासकरवर गुन्हेशाखेने 'मकोका' अंतर्गत  गुन्हा नोंदविला आहे.

आरोपींना न्यायलयात घेऊन जाताना पोलीस

By

Published : Jul 29, 2019, 5:37 PM IST

Updated : Jul 29, 2019, 5:46 PM IST

मुंबई- व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा पुतण्या व इकबाल कासकर याचा मुलगा रिझवान कासकरवर गुन्हेशाखेने 'मकोका' अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सोमवारी मुंबईतील मकोका न्यायालयात रिजवान कासकर, अहमद रजा व अश्फाक टॉवेलवाला या आरोपींना हजर करण्यात आले.

आरोपींना न्यायलयात घेऊन जाताना पोलीस

खंडणीविरोधी पथकाने खंडणीप्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल मकोका न्यायालयात सादर करण्यात आला. तसेच नमूद आरोपींवर मकोका कलम लावण्यात आल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले. यासंबंधी अधिक हवालाचा वापर कसा होत होता हे तपासणे गरजेचे असल्याचे सांगत तापसाकरता आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. याला अनुसरून न्यायालयाने या तीनही आरोपींना 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतल्या दोन व्यवसायिकामध्ये आयात विक्रीच्या पैशावरुन वाद सुरू होता. यासाठी अश्फाक टॉवेलवाला याने फईम मचमचला सांगितले. फईम मचमचने अश्फाक टोपीवाला यांच्याकडे कोणत्याही पैशाची मागणी करू नये, असे व्यापाऱ्याला धमकावले. यानंतर, व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण गँगस्टरकडे कोणी नेले याचा गोपनीय तपास सुरू झाला. तपासामध्ये आरोपी अहमदरजा अफरोज वधारिया (वय २४) या प्रकरणामध्ये सक्रिय असल्याचा दिसून आला. दुबईवरुन १५ जुलैला मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीत अहमदरजा वधारिया याची ओळख दाऊदच्या पुतण्या रिजवान इक्बाल हसन शेख याने फईम मचमच आणि छोटा शकील यांच्याशी करुन दिली होती आणि व्यापाऱ्याला पैसे न मागण्यासाठी धमकावले होते.

पोलिसांनी ही बाब निदर्शनास आल्यानंतर रिजवानचा शोध सुरू झाला. अटकेतून वाचण्यासाठी तो १७ जुलैला दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांना याची माहिती मिळताना रिजवानला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीत्या आधारावर अश्फाक टॉवेलवाला याला आज (१८ जुलै) अटक करण्यात आली होती.

Last Updated : Jul 29, 2019, 5:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details