मुंबई -कार्डिया क्रुझवरील ड्रग्स पार्टीची कारवाई बोगस आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला पकडणारे अधिकारी हे एनसीबीचे नसून, ते भाजपाचे पदाधिकारी असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपात तथ्य नसल्याचा एनसीबीने खुलास करत क्रूझवर केलेली कारवाई नियमानुसार केली आहे. तसेच या कारवाईत आर्यन खानसह आठ आरोपींना ड्रग्ससहित ताब्यात घेतले. के. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली यांच्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एनसीबीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
'एनसीबीची पूर्ण कारवाई सर्व नियमानुसार'
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या आरोपानंतर काही तासातच एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. के. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली यांच्या माहितीचा आधारवर २ ऑक्टोबर २०२१ रोजी कार्डिया द क्रुझवर छापा टाकला होता. या कारवाईत त्याची आम्हाला मदत मिळाली आहे. या कारवाईत बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण आठ जणांना क्रुझवरुन अटक केली आहे. त्यांच्या जवळून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. मोहन जेस्वालची प्राथमिक चौकशी केल्यानंतर जोगेश्वरी आणि गोरेगावमध्ये धाड टाकली होती. या कारवाईत अब्दुल शेखसह तीन आरोपीना अटक केली आहे. त्यांच्याकडूनही अमली पदार्थ सापडून आले होते. याशिवाय कार्डिया द क्रुझवरचा ड्रग्ज पार्टीचा चौकशीत इव्हेंट मैनेजमेंटमधील समीर सैगल, गोपाळ आंदन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघल या चार जणांना अटक केली आहे. ही संपूर्ण कारवाई पूर्णपणे पारदर्शक आणि नियमानुसार सुरु आहे. आमच्या कारवाईवर केलेल्या आरोपात काही तथ्य नसल्याची माहिती एनसीबीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
नवाब मलिकचे आरोप -