महाराष्ट्र

maharashtra

Action Taken Against Schools : विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देणाऱ्या दोन शाळांविरुद्ध कारवाई - शालेय शिक्षण मंत्री

By

Published : Apr 5, 2022, 7:15 PM IST

Updated : Apr 5, 2022, 7:38 PM IST

विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देणे, वर्गाबाहेर उभे करणे, मानसिक त्रास देणे आणि शैक्षणिक नुकसान होईल, अशी कृती करणाऱ्या शाळांची किंवा शैक्षणिक संस्थांची गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Minister Varsha Gaikwad ) यांनी दिली आहे.

शालेय शिक्षण मंत्री
शालेय शिक्षण मंत्री

मुंबई -शाळेची फी भरली न भरलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे केले, इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानित करून मानसिक त्रास शाळेकडून देण्यात आले, अशी तक्रार शिक्षण विभागाकडे आली होती. शिक्षण विभागाने याची दखल घेत कांदिवली पश्चिम येथील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूल तसेच पुण्याच्या उंड्री येथील युरो स्कूल या शाळांवर कारवाई केली आहे.

प्राचार्य विरोधात गुन्हा दाखल -कोरोना संदर्भातील निर्बंधांमुळे यावर्षी शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात आला. कोविडमूळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. या काळात शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना विलंब झाला होता. ही एकंदरीत परिस्थिती विचारात घेऊन विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या आधार द्यावा, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची दक्षता घेण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत, कांदिवली पश्चिम येथील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूल तसेच पुण्याच्या उंड्री येथील युरो स्कूलमध्ये शुल्क भरली नसल्याने विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जात होती. याबाबत पालकांनी शालेय शिक्षण विभागाकडे तक्रार दिली होती. विभागाने याची दखल घेत कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य रेश्मा हेगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर पुण्याच्या उंड्री येथील युरो स्कूबाबत उपसंचालक, पुणे यांनी भेट देऊन चौकशी केली असून शाळेला नोटीस बजावली आहे.

कडक कारवाई करणार - वर्षा गायकवाड -विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देणे, वर्गाबाहेर उभे करणे, मानसिक त्रास देणे आणि शैक्षणिक नुकसान होईल, अशी कृती करणाऱ्या शाळांची किंवा शैक्षणिक संस्थांची गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Minister Varsha Gaikwad ) यांनी दिली आहे.

हेही वाचा -Congress Upset on Home Ministry : काँग्रेसची गृहमंत्र्यांवर नाराजी, नाना पटोले म्हणाले...

Last Updated : Apr 5, 2022, 7:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details