मुंबई -कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी मुंबई शहरामध्ये विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. अशाच एका कारवाईदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर एकाने कोयता उगारल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
उत्तर मुंबई परिसरात महानगरपालिकेचे अधिकारी उन्मेष राणे व एक महिला कर्मचारी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करत होते. तेव्हा एका व्यक्तीने अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली. त्यानंतर त्याने जवळचा कोयता अधिकाऱ्यांवर उगारला. ही व्यक्ती कोण होती, याचा उलगडा झालेला नाही. तसेच याप्रकरणी गुन्हाही दाखल झालेला नाही.
1 लाखांहून अधिकनागरिकांवर कारवाई
मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 1 लाख 60 हजार नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान दंड भरला नाही तर, रस्त्यावरील कचरा साफ करण्याचं काम सुद्धा करून घेतले जात आहे.