मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहन सरकार आणि पालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही अनेक नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. विनामास्क नागरिकांवर, रेल्वे प्रवाशांवर पालिका, क्लिनअप मार्शल तसेच पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण २६ लाख ८७ हजार ३३९ नागरिकांवर कारवाई करत ५४ कोटी १३ लाख ५९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विनामास्क नागरिकांवर कारवाई -
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता मार्च २०२०पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अमलात आणलेल्या आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी विनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २० एप्रिल २०२०पासून कारवाई केली जात आहे. त्यानुसार एकूण २५ लाख ५३ हजार ५४६ नागरिकांवर कारवाई करत ५१ कोटी ४६ लाख ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पालिकेची कारवाई -
मुंबई महापालिकेने आतापर्यंत २३ लाख ५० हजार १५९ नागरिकांवर कारवाई केली आहे. या कारवाई मधून ४७ कोटी ३६ लाख ६२ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.
पोलिसांची कारवाई -