मुंबई- दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. मुंबईत गेल्या ५ वर्षात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या १८ ते २० वर्षे वयोगटातील १ हजार ८५४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १३८ कोटी ८६ लाख ५९ हजार २२४ रुपये एवढा दंड वसूल केला आहे. २०१७ च्या काळात हाच दंड ८५ कोटी ७८ लाख ६० हजार ३५५ रुपये एवढा वसूल करण्यात आला होता. वाहतूक पोलिसांना देण्यात आलेल्या ई चलन कार्यप्रणालीमुळे वाहतूक पोलीस विभागात भ्रष्टाचार कमी होऊन मद्यपी वाहनचालकांवर व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली गेल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.
हेही वाचा - मुंबईतील १६ पुलांवरील 'भार' पालिका कमी करणार