मुंबई- महानगरपालिका मुख्यालयात स्थापत्य समितीची बैठक सुरू असतानाच काच कोसळली. त्यात स्थापत्य समितीच्या अध्यक्षांसह तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले. स्थायी समितीत याचे पडसाद उमटले तर महापौरांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर पालिका प्रशासनाने पालिका मुख्यालयात लावण्यात आलेल्या काचा बदलून त्याजागी अॅक्रॅलिकच्या काचा वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयात काचा फुटून झालेल्या अपघातानंतर आता अॅक्रॅलिकचा वापर - accident in MNC
महापालिका मुख्यालयात स्थापत्य समितीची बैठक सुरू असताना बुधवारी काच पडल्याची घटना घडली. बैठक सुरू असतानाच स्थापत्य समिती अध्यक्ष व तीन जणांवर काच पडल्याने त्यात ते किरकोळ जखमी झाले. या घटनेचे पडसाद स्थायी समितीत उमटले.
![मुंबई महानगरपालिका मुख्यालयात काचा फुटून झालेल्या अपघातानंतर आता अॅक्रॅलिकचा वापर मुंबई](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5445144-thumbnail-3x2-mum.jpg)
महानगरपालिका मुख्यालयात स्थापत्य समितीची बैठक सुरू असताना बुधवारी काच पडल्याची घटना घडली. बैठक सुरू असतानाच स्थापत्य समिती अध्यक्ष व तीन जणांवर काच पडल्याने त्यात ते किरकोळ जखमी झाले. या घटनेचे पडसाद स्थायी समितीत उमटले. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष तसेच महापौरांनी आता पालिकेत बैठकांना आणि सभागृहात कामकाज करताना काचा आणि झुंबरांची भीती वाटत असल्याचे म्हटले. या प्रकरणी चौकशीचे आदेश देताना मुख्यालयातील काचा काढून टाकण्याचे आदेशही देण्यात आले. त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पालिका मुख्यालयाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून अनेक ठिकाणी काचेचे दरवाजे बसवण्यात आले. पावसाचे पाणी मुख्यालयातील गॅलरीमध्ये येऊ नये म्हणून काचा लावण्यात आल्या. विविध समितीच्या बैठकांसाठी सभागृह बनवण्यात आली. त्यात विभागण्या करण्यासाठी उंच ठिकाणी काचा लावण्यात आल्या. काच फुटल्याचे पडसाद उमटल्यावर या काचा काढून त्याजागी अॅक्रॅलिकचा वापर करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.