मुंबई मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे 15 ऑगस्ट रोजी रिलायन्स हॉस्पिटलच्या फोनवर धमकी देण्यात आली होती आतंकवादी अफजलगुरू आहे, असे सांगून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश धीरूभाई अंबानी व त्यांचे दिवंगत वडील धीरूभाई अंबानी यांचे नावाने वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली होती असे पोलीस तपासात समोर आले आहे आरोपीने दहशतवादी अफझल गुरूचे नाव घेताच केंद्रीय आणि राज्य यंत्रणांनी समांतर तपास सुरू केला होता आरोपी विष्णू भूमिका यांनी एच एन रिलायन्स हॉस्पिटल इमर्जन्सी क्रमांक त्यावर नऊ वेळा फोन करून धमकी दिली होती विष्णू बिंदू भूमिक वय 56 याला बोरिवली येथून ताब्यात घेण्यात आले होते
रिलायन्स हाॅस्पिटलच्या फोनवर धमकी कलम 506 2 भादंविनुसार गुन्हा दी बी मार्ग पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे दिनांक 15/08/2022 रोजी 10.39 ते 15/08/2022 12.04 या काळात आरोपीने काॅल केले होते आरोपीने 15 ऑगस्ट रोजी रिलायन्स हॉस्पिटलच्या फोनवर धमकी देऊन अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केलीहोती एचएन रिलायन्स हॉस्पिटल एसएसव्हीपी रोड ग्रँड रोड मुंबई येथील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून धमकी दिली होती फिर्यादी प्रिन्स ओमप्रकाश सिंग वय 38 वर्ष व्यवसाय नोकरी सिक्युरिटी मॅनेजर यांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली
केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवली आरोपीने दहशतवादी अफझल गुरूचे नाव घेताच केंद्रीय आणि राज्य यंत्रणांनी समांतर तपास सुरू केला होता आरोपी विष्णू भूमिका यांनी एचएन रिलायन्स हॉस्पिटल इमर्जन्सी क्रमांक त्यावरती नऊ वेळा फोन करून धमकी दिली होती विष्णू बिंदू भूमिक वय 56 याला बोरिवली येथून ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे