महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महापौर पेडणेकर यांना धमकी देणाऱ्या आरोपीस 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी - MUMBAI LATEST NEWS

महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्या आरोपीला 10 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत.

Accused who threatened Mayor Kishori Pednekar has been remanded in police custody
महापौर किशोरी पेडणेकरणा धमकी देणाऱ्या आरोपीला 10 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी

By

Published : Jan 7, 2021, 5:05 PM IST

Updated : Jan 7, 2021, 5:53 PM IST

मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर यांना फोन करून अर्वाच्य भाषा वापरून धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी गुरजारच्या जामनगर येथून बुधवारी अटक केली होती. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

महापौरांना धमकी -

२२ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता महापौर किशोरी पेडणेकर यांना एक फोन आला. एका अज्ञात व्यक्तीने महापौरांना फोन वर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. फोनवर बोलणारा हिंदी भाषेत बोलत होता. फोनवरून मुंबईच्या महापौरांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली आहे. या धमकीच्या फोन नंतर दोन दिवसांनी महापौरांनी महापालिका मुख्यालयाला लागून असलेल्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर २६१/२०२० नोंदवला होता.

मुंबई पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून मनोज दोढी याचा शोध घेतला असून त्याला गुजरातच्या जामनगर येथून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक विलास तुपे आणि त्यांचे पथक करत आहे. मनोज दोढी या २० वर्षीय युवकाने हे कृत्य का केलं, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

Last Updated : Jan 7, 2021, 5:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details