मुंबई - अँटिलिया स्फोटके आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या पोलीस निरिक्षक सुनील मानेची रवानगी न्यायायलीय कोठडीत करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने 13 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनसूख हिरेनच्या हत्येत थेट सहभाग असल्याचा आरोप तपासयंत्रणेकडून सुनील मानेवर आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ असलेल्या कारमध्ये स्फोटक सामग्री सापडल्याच्या प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने शनिवारी निलंबित पोलीस अधिकारी सुनील माने यांना शनिवारी 13 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविले.
अँटेलिया स्फोटक प्रकरण : आरोपी सुनील मानेची 13 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी - Sunil mane
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ असलेल्या कारमध्ये स्फोटक सामग्री सापडल्याच्या प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने शनिवारी निलंबित पोलीस अधिकारी सुनील माने यांना शनिवारी 13 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविले.
दक्षिण मुंबईतील अंबानी यांच्या घराजवळील कारमध्ये स्फोटक सापडलेल्या आणि ठाणे येथील रहिवासी मनसुख हिरण यांच्या मृत्यूच्या संदर्भात माने यांना एप्रिलमध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) अटक केली होती. माने यांच्या वतीने न्यायालयात त्यांचे वकील आदित्य गोरे म्हणाले, की पोलीस अधिकारी असल्याने तुरुंगात सुरक्षित राहण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर न्यायाधीश भोसले यांनी तुरूंग अधिकाऱ्यांना मानेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि रियाज काझी यांच्या अटकेनंतर मुंबई गुन्हे शाखेशी संबंधित माने हा तिसरा पोलीस अधिकारी आहे. वाझे आणि काझी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
मागील सुनावणीत मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने मनासुख हिरन प्रकरणात सुनील मानेची एनआयए कोठडी 1 मेपर्यंत वाढवली. मनसुख हिरेन खून प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील माने यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, अशी एनआयएने कोर्टाला माहिती दिली. एनआयएने इन्स्पेक्टर सुनील माने यांना न्यायालयात हजर केले असता एनआयएने सांगितले, की सुनील माने 4 मार्च रोजी संध्याकाळी आपल्या कार्यालयात नव्हते तर मनसुखची हत्या झाली तेव्हा ठाण्यात गेले होते. एनआयएच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की 4 मार्च रोजी सुनील माने यांनी आपला मोबाइल बंद केला आणि तो आपल्या बॅगमध्ये ठेवला. बॅग त्याच्या कार्यालयात ठेवली, असल्याची माहिती कोर्टाला दिली.